

पणजी : गोव्यात महिला काँग्रेसतर्फे दहा हजार महिलांना महिला काँग्रेसच्या सदस्य बनवण्यात येईल आणि त्यांना राजकारणामध्ये पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, अशी माहिती काँग्रेसच्या गोवा महिला प्रभारी शीतल म्हात्रे यांनी दिली. शनिवारी पणजी येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बिना नाईक उपस्थित होत्या.
म्हात्रे यांनी पुढे सांगितले, की महिला काँग्रेसचे सदस्य अभियान राबवण्यासाठी मी गोव्यात आले असून, येथील महिलांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. गोव्यात महिलांवरील अत्याचार वाढलेले आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरकार महिलांना सुरक्षा पुरवण्यात अयशस्वी ठरले आहे, असा आरोपही या प्रसंगी म्हात्रे यांनी केला.
महिला घराघरांमध्ये पोहोचू शकतात. त्यामुळे महिला राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात येण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. काँग्रेसचे काम करण्यास सुलभ व्हावे यासाठी महिलांसाठी वेबसाईट सुरू केली जाईल, अशी माहिती देऊन गोव्यामध्ये एका महिला पणजी: पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेत्या शीतल म्हात्रे. सोबत बिना गट अध्यक्ष व पंचाला सरकारतर्फे त्रास दिला जात असल्याची टीका त्यांनी केली. ३५ टक्के महिला आरक्षण हा ठराव काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी मांडला होता, असा दावा त्यांनी केला.