

पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्याच्या काही भागात थंडीची चाहूल लागली आहे. गोवा वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी पणजीत किमान तापमान २०.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. त्यामुळे पहाटे आणि रात्री गारवा जाणवत आहे. मात्र, दुपारी उन्हाचा तडाखा कायम आहे. शुक्रवारी दुपारी कमाल तापमान ३६.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हे तापमान दाबोळी येथे नोंदवण्यात आले.
पणजी येथील तापमान ३४.६ नोंदवण्यात आले होते, तर किमान तापमान २०.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. सकाळी आणि रात्री थंडी, तर दुपारी उष्णता अशा संमिश्र वातावरणामुळे सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ झाली आहे.
नागरिकांनी थंडीत वाहन चालवताना योग्य त काळजी घ्यावी. तसेच, दुपारच्या उष्णतेत शक्यत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पणजी, गिरी, अस्नोडा, गोव दोडामार्गसह सत्तरी आणि डिचोली परिसरात व घाटालगतच्या भागांत पहाटे आणि रात्री मोठ्या प्रमाणात थंडी जाणवत आहे.