61.4 lakh tourists visit Goa-सात महिन्यांत ६१.४ लाख पर्यटकांची गोव्याला भेट

पावसाळ्यात पर्यटन बहरले; जुलैमध्ये पर्यटक संख्येत २.२७ टक्क्यांची वाढ
Tourisam
Tourisam
Published on
Updated on

पणजी : जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत राज्यात तब्बल ६१.३८ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यात एकूण ०.०८ टक्के वाढ झाली आहे. २०२६ च्या पहिल्या सात महिन्यांत राज्यात ५९.०२ लाख देशांतर्गत आणि २.३६ लाख आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे स्वागत करण्यात आले, हे पर्यटन विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.

Tourisam
Goa CM job announcement |सहा महिन्यांत आठ हजार नोकऱ्या

जुलै २०२६ मध्ये एकूण ६.९४ लाख पर्यटकांचे आगमन झाले. जे जुलै २०२५ च्या तुलनेत २.२७ टक्के वाढ दर्शवते. ही आकडेवारी गोव्याच्या पर्यटन आकर्षणाची सातत्यपूर्ण वृद्धी दिसून येते. पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, आकडेवारीवरून स्पष्ट होते की, गोवा एक पर्यटनस्नेही स्थळ पर्यटकांची प्रथम पसंती आहे. देशांतर्गत पर्यटकांच्या आगमनातील वाढ आणि दिसून येणारी सकारात्मक गती उत्साहवर्धक आहे.

आम्ही केवळ आकड्यांपलीकडे जाऊन आमच्या सेवा आणि बाजारपेठांमध्ये विविधता आणण्यासाठी, आंतरराष्ट्रीय संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी आणि सर्व ऋतूंमध्ये पर्यटकांना आकर्षित करू शकतील, अशी पर्यटन उत्पादने तयार करण्यासाठी काम करत आहोत.

पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, पारंपरिकरित्या पावसाळा हा गोव्यासाठी पर्यटनाचा कमी गर्दीचा काळ मानला जातो. राज्य सरकारने पावसाळी पर्यटन आणि अनुभव-आधारित प्रवासाला सक्रियपणे प्रोत्साहन दिले आहे, जेणेकरून पर्यटक या हिरव्या हंगामात गोव्याचा अंतर्गत भाग, संस्कृती, आरोग्य, खाद्यसंस्कृती, निसर्ग आणि साहसी उपक्रमांचा अनुभव घेऊ शकतील.

Tourisam
Goa|काँग्रेस पक्षांतरांची 'हॅट्ट्रिक' करणार

आंतरराष्ट्रीय पर्यटनात ठसा विस्तारण्याचे प्रयत्न

आमचे उद्दिष्ट केवळ गोव्यात अधिक पर्यटक आणणे हे नाही, तर गोवा देऊ करत असलेल्या अनुभवांसाठी योग्य पर्यटकांना आणणे हे आहे. वेलनेस, हेरिटेज, एमआयसीई, साहसी उपक्रम, सागरी पर्यटन, आध्यात्मिक पर्यटन, खाद्यसंस्कृती हे पारंपरिक समुद्रकिनाऱ्यावरील सुट्ट्यांच्या पलीकडे जाऊन पर्यटकांना गोव्याला भेट देण्यासाठी नवीन कारणे निर्माण करत आहेत. राज्य सरकार उदयोन्मुख आणि प्रस्थापित स्रोत बाजारपेठांमध्ये सहभागी होऊन, हवाई संपर्क अधिक मजबूत करून आणि लक्ष्यित पर्यटन उत्पादने विकसित करून आपला आंतरराष्ट्रीय पर्यटनात ठसा विस्तारण्याचे प्रयत्नही तीव्र करत आहे, असेही पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news