Vasco News | येथे टाकाऊ कचऱ्याचा 'डंप एरिया' बनवायचा आहे का?

Vasco News | वरुणापुरी-मांगोरहिल चौकाच्या रस्त्याकडेला ढिगारे हटविण्याकडे दुर्लक्षच; नागरिकांत संताप
Pimpri News
एमआयडीसीत कचऱ्याचा प्रश्न बनला गंभीर Pudhari
Published on
Updated on

वास्को : पुढारी वृत्तसेवा

वरुणापुरी मांगोरहिल चौकातील रस्त्याकडेला मोठा प्रमाणात बांधकामाचे टाकाऊ साहित्याचे ढिगारे तयार झाले आहेत. याप्रकरणी कोणी तक्रार केल्यावर मुरगाव पालिकेने बुधवारी (दि. २०) सायंकाळी तीन वाहने धरली. या वाहनांवर कारवाई करण्यात यावी यासाठी सदर वाहनांचे क्रमांक पोलिसांना देण्यात आले असल्याचे समजते.

Pimpri News
Patradevi Highway Accident | पेडणे पत्रादेवी येथे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; जेष्ठ नागरिकाला कंटेनरने चिरडले

रस्त्याच्या कडेला बांधकामाचे टाकाऊ साहित्याची डम्प एरिया करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच मुरगाव पालिकेने घेतला आहे, काय सवाल उपस्थित करण्यात येत आहे. क्रुणापुरी मांगोरहिल ते शांतीनगर दरम्यानच्या महामार्गाच्या दुतर्फा बांधकामाचे टाकाऊ साहित्य, आसपासच्या वस्तीतील कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे तेथील गटारे बुजली गेली आहे.

रस्त्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा जमा झालेला दिसतो. आता बांधकामाचे टाकाऊ साहित्य वाहून नेणाऱ्या वाहनचालकांनी रस्त्याकडेला टाकाऊ साहित्य टाकण्याचे प्रकार सुरू केले आहेत. गेल्या काही महिन्यात येथे बांधकामाचे टाकाऊ साहित्याचे ढिगारे तयार झाले आहेत. त्यामध्ये फुटलेली कौले, शौचालयातील विविध वस्तू, फुटलेल्या फरश्या, चिरे, दगड, माती, घट्ट झालेले सिमेंट काँक्रीट तसेच इतर वस्तूंचा समावेश आहेत.

वरुणपुरी मांगोरहिल चौकातील मांगोरहिल पोलिस बुथच्या मागील भागात मोठ्या प्रमाणात सदर साहित्य नजरेस पडते. हे साहित्य आता रस्त्यावर आले आहे. याप्रकरणी वाहतूक पोलिस, मुरगाव पालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दखल घेण्यास तयार नसल्याने सदर परिस्थिती उद्भवली आहे.

वरुणापुरी- मांगोरहिल चौकातील रस्त्याकडेला बुधवारी सायंकाळी दोन वाहनांतून दगडमाती व टाकाऊ साहित्य ओतण्यात येत असल्याची तक्रार आल्याने पालिका पर्यवेक्षकाने तेथे धाव घेतली. त्यावेळी माती रस्त्याकडेला ओतण्याचे काम सुरू होते. त्या पर्यवेक्षकाने व्हिडियो काढण्यास आरंभ केला तरी ते मजूरांनी न घाबरता तेथे वाहनातील सर्व माती ओतली.

Pimpri News
Goa Micky Pacheco | मिकी पाशेको बाणावलीतून तर पत्नी नुवेतून लढणार

एक वाहनातून टाकाऊ साहित्य आणून तेथे वाहन उभे करण्यात आले होते. त्याप्रमाणे काही अंतरावर असलेल्या एका ठिकाणी आणखी एक वाहन आले होते. त्या सर्व वाहनांचे व्हिडिओ काढण्यात आले आहेत.

याप्रकरणी वाहनांचे क्रमांक पोलिसांना देण्यात आले आहेत. मात्र पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वी कोणी राजकीय नेता दबाब आणतो काय यासंबंधी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. एवढ्या मोठ्या तेथे कोणाला न घाबरता टाकाऊ साहित्य टाकणाऱ्यांना राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news