CM Pramod Sawant : 'उज्ज्वला'चे पुरुषांनी भरलेले अर्ज ग्राह्य

डॉ. प्रमोद सावंत; संजीवनी साखर कारखाना पुन्हा सुरू होणार
CM Pramod Sawant
CM Pramod Sawantpudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी : गोवा उञ्चला योजनेंतर्गत ४०,००० हून अधिक पुरुष अर्जदारांनी अर्ज केले आहेत. एकूण अर्जाची संख्या अडीच लाखांच्या पुढे गेली आहे. पुरुषांनी भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात आले असून कोणीही पुन्हा अर्ज भरू नयेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत डॉ. सावंत बोलत होते. यावेळी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, पात्र पुरुष अर्जदारांनाही छाननीनंतर लाभ मिळेल. त्यांचे अर्ज नाकारू नयेत, असे निर्देश नागरी पुरवठा विभागाला दिले आहेत. जवळपास एक लाख लाभार्थ्यांना यापूर्वीच मदत मिळाली आहे. ही योजना पुढील वर्षीही सुरू राहील. संजीवनी साखर कारखाना पुढील गाळप हंगामापासून पुन्हा सुरू होईल.

CM Pramod Sawant
Goa Politics| संतोष यांच्या दौऱ्यात निवडणुकीचे नियोजन

तो सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर चालवण्यासाठी एका बोलीदाराला अंतिम रूप देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवड पुन्हा सुरू करावी. त्यांचा ऊस पूर्वीप्रमाणे पुढील हंगामापासून खरेदी केला जाईल.

डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, सरकारने कंत्राटी तत्त्वावर दोन नियुक्त्यांना मंजुरी दिली आहे. एक नियुक्ती फोंडा येथील शासकीय पॉलिटेक्निकमध्ये प्रयोगशाळा सहायकासाठी तर दुसरी नियुक्त्ती बांबोळी येथील मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्थेत मानसोपचार सामाजिक कार्यकर्त्यासाठी आहे.

CM Pramod Sawant
Goa News : प्रशांत काकोडे ‘जीसीए’ समितीतून निलंबित

सरकार मनुष्यबळ मूल्यांकन करून पर्वरी येथील शिक्षण संचालनालयातील एकूण मंजूर पदे निश्चित करेल. गोवा राज्य माहिती आयोगाचे प्रशासकीय नियंत्रण माहिती आणि प्रसिद्धी विभागाकडून सामान्य प्रशासन विभागाकडे (जीएडी) हस्तांतरित केले जाईल. या निर्णयानुसार आयोगाची प्रशासकीय जबाबदारी जीएडीवर सोपवण्यात येणार आहे. गोवा मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नमो तरंग या विशेष उद्देश वाहनाला (एसपीव्ही) औपचारिक स्वरूप देण्यास गोवा मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news