Goa Ujjwala Yojana | प्रलंबित उज्ज्वला पेमेंट पंधरा दिवसांत देणार; मंत्री संकल्प आमोकर यांची घोषणा

Goa Ujjwala Yojana | मंत्री संकल्प आमोकर : अर्जाची योग्य ती छाननी सुरू
Pradhan Mantri Ujjwala Yojana
Pradhan Mantri Ujjwala Yojanapudhari photo
Published on: 
Updated on: 

पणजी (पुढारी वृत्तसेवा): गोवा उज्ज्वला योजनेसाठी एकाच कुटुंबाच्या नावे अनेक अर्ज प्राप्त झाल्यामुळे काहीचे अर्ज प्रलंबित आहेत. मात्र, येत्या १५ दिवसांत प्रलंबित अर्जाची योग्य ती छाननी करून अर्ज मंजूर केले जातील, अशी माहिती नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याचे नवे मंत्री संकल्प आमोकर यांनी दिली.

Pradhan Mantri Ujjwala Yojana
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

संकल्प आमोकर यांनी मंगळवारी खात्याच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन राज्यभरातील नागरी पुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन खात्याच्या कामकाजाची माहिती घेतली आणि महत्त्वाच्या प्रलंबित बाबींचा आढावा घेतला. त्यानंतर आमोकर म्हणाले की, एकाच कुटुंबातील जे अनेक अर्ज आले आहेत, त्या अर्जदारांशी संपर्क साधून त्यांना प्रत्येक कुटुंबासाठी एकच अर्ज एकत्रित करण्यास सांगितले जाईल, असे आमोकर म्हणाले.

आमोकर यांनी सांगितले की, गोवा उज्ज्वला योजनेंतर्गत सर्व प्रलंबित अर्जांवर पुढील १५ दिवसांत प्रक्रिया करून ते निकाली काढले जातील. एकाच घरातून अनेक अर्ज सादर केल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर सरकार तोडगा काढत आहे. मंत्र्यांनी सांगितले की, खात्याने या योजनेंतर्गत सुमारे अडीच लाख अर्ज दाखल झाले होते.

Pradhan Mantri Ujjwala Yojana
Panaji Municipal Corporation | ...आणि पणजी महापालिकेला आली जाग

सुमारे एक लाख अर्ज निकालात काढण्यात सरकारला यश आले आहे. असे सांगून या योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरसाठीची तीन हजार रुपयांची रक्कम अर्जदाराच्या खात्यात वर्ग केली जाईल, असे आश्वासन आमोकर यांनी दिले.

सहा महिन्यांचे रेशन न नेलेल्यांची रेशन कार्डे तातडीती निलंबित करण्यात येतील, रद्द केली जाणार नाहीत, अशी माहितीही आमोकर यांनी एका प्रश्नावर बोलताना दिली. अशा रेशन कार्डधारकांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून तसेच आवश्यक पावती अनिवार्यपणे आपले रेशनकार्ड पुन्हा सक्रिय करता येईल.

रेशन कार्डधारकांना धान्य मिळावे हेच सरकारचे धोरण आहे. मात्र जर सहा महिने धान्य कोणी नेले नाही तर त्याला ते नको आहे का याचा तपासही केला जाईल. असे सांगून प्रस्ताव नियमावली, प्रक्रिया आणि लाभार्थ्यांना दिलेल्या सूचना अधिकृतता, त्यासंबंधीची महत्त्वाची ठरणार आहे. सहा महिने धान्य न नेल्यांची कार्डे तातडीने निलंबित केली जातील, अशी माहिती नागरी पुरवठा संचालक जयंत तारी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.