Goa Tourist Taxi Tariff | गोव्यात टॅक्सी प्रवास महागला! 3 किलोमीटरसाठी मोजावे लागणार 300 ते 1 हजार रुपये भाडे

Goa Tourist Taxi Tariff | अधिसूचना जारी : राज्यातील टुरिस्ट टॅक्सींसाठी सुधारित दर लागू
Goa Tourist Taxi Tariff
Goa Tourist Taxi Tariff
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्य परिवहन प्राधिकरणाने टुरिस्ट टॅक्सी आणि प्रीमियम कॅबसाठी स्वतंत्र सुधारित दर निश्चित केले आहेत. वाहतूक खात्याचे संचालक अरविंद खुटकर यांनी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून, नवीन दर लागू झाले आहेत. वाहनचालकांनी सुधारित दर आपल्या वाहनांमध्ये ठळकपणे प्रदर्शित करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Goa Tourist Taxi Tariff
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

टुरिस्ट टॅक्सींसाठी अंतरानुसार दर निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या ३ किलोमीटरसाठी हॅचबॅक किंवा सेडानसाठी ३०० रुपये, सामान्य एसयूव्हीसाठी ४०० रुपये, प्रीमियम एसयूव्हीसाठी ५०० रुपये, तर प्रीमियम कॅबसाठी १ हजार रुपये भाडे आकारले जाणार आहे.

३.१ ते ८ किलोमीटर अंतरासाठी लहान हॅचबॅकसाठी ४४५ रुपये, तर प्रीमियम कॅबसाठी १ हजार ७४५ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. ८ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी वाहनाच्या प्रकारानुसार प्रतिकिलोमीटर २९ ते १४९ रुपये दर आकारला जाणार आहे. याशिवाय ३५ टक्के अतिरिक्त शुल्क आणि रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत प्रतितास १०० रुपये रात्रीचे शुल्क लागू होणार आहे.

Goa Tourist Taxi Tariff
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

ग्राहकांना टोल, फेरी शुल्क, कर आणि पार्किंग शुल्कही स्वतंत्रपणे भरावे लागणार आहे.
पहिल्या ३ किलोमीटरसाठी हॅचबॅक व सेडानचे भाडे ३०० रुपये, सामान्य एसयूव्हीसाठी ४०० रुपये आणि प्रीमियम एसयूव्हीसाठी ५०० रुपये असेल. ३.१ ते ८ किलोमीटरसाठी हे दर अनुक्रमे ४३०, ५६० आणि ६६० रुपये असतील.

८ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी हॅचबॅक व सेडानसाठी प्रतिकिलोमीटर २६ रुपये, तर एसयूव्हीसाठी ३२ रुपये दर आकारला जाईल. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत ३५ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. तसेच, पालिका हद्दीबाहेरील एकेरी प्रवासासाठी मूळ भाड्याच्या ५० टक्के अतिरिक्त रक्कम आकारता येणार आहे.

काळ्या-पिवळ्या टॅक्सींचेही दर सुधारले:

राज्यातील काळ्या-पिवळ्या टॅक्सींच्या भाडेदरातही सुधारणा करण्यात आली असून, किमान भाडे ३०० रुपये निश्चित करण्यात आले आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाची अधिसूचना शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६ पासून लागू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news