Goa News | गोव्यात ही १९ प्रकारची कृत्‍ये 'उपद्रव' घोषित : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 5 लाखापर्यंत दंड

पर्यटन खात्याचा निर्णय : आदेश तात्काळ लागू
Goa News
Goa NewsPudhari
Published on
Updated on

पणजी : गोव्यातील पर्यटनस्थळांवरील स्वच्छता, कायदा-सुव्यवस्था आणि पर्यटनाची प्रतिमा जपण्यासाठी गोवा पर्यटन खात्याने महत्त्वपूर्ण आदेश जारी केला आहे. गोवा पर्यटन स्थळे संरक्षण व देखभाल कायद्यानुसार राज्यातील सर्व पर्यटनस्थळांवर १९ प्रकारच्या अनधिकृत व अस्वच्छ कृत्यांना 'उपद्रव' घोषित करण्यात आले असून हा आदेश तात्काळ लागू झाला आहे.

उल्लंघन करणाऱ्यांना लाखापर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. या आदेशानुसार अनधिकृत वॉटर स्पोर्ट्स व बोटिंग, परवानगीशिवाय फेरी विक्री, क्रूझ व वॉटर स्पोर्ट्स तिकिटांची दलाली, अनधिकृत बीच शॅक्स, डेक बेड्स, बीच पार्ट्या, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, कचरा टाकणे, मोकळ्या जागेत स्वयंपाक करणे, भीक मागणे

Goa News
CM Pramod Sawant | "मुख्यमंत्रीपद कधीही मागितले नाही! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मोठे वक्तव्य"

समुद्र किनाऱ्यावरील सरकारी जमिनीवर बेकायदा अतिक्रमण, समुद्र किनाऱ्यावर अनधिकृत वाहनांचा वापर, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका किंवा शौच करणे, समुद्रकिनारे प्रदूषित करणे, अनधिकृत मसाज सेवा देणे किंवा अशा व्यक्तींशी संबंधित बेकायदा व्यवहार यावर बंदी घालण्यात आली आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना निर्देश देण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा कंपन्यांवर ५ हजार ते १ लाखांपर्यंत दंड आकारला जाईल. तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २२३ अंतर्गतही कारवाई केली जाऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news