Goa Tourism AI Chatbot | पर्यटकांसाठी गोवा सरकारचे मोठे पाऊल! AI चॅटबॉट सहाय्यक सेवेचे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते उद्घाटन

Goa Tourism AI Chatbot | गोवा पर्यटन खात्याचा उपक्रम : लवकरच मराठी, कोकणी भाषेतही मिळणार
Murud Beach Tourism
Murud Beach TourismPudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी नुकतेच आयोजित गोवा युवा पर्यटन संमेलन २०२६ पर्यटकांच्या मदतीसाठी एआय चॅटबॉट सहाय्यक सेवेचे उद्घाटन केले. राज्यात येणारे पर्यटक आणि स्थानिक नागरिक आता एआय चॅटबॉटच्या मदतीने पर्यटन खाते व पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) च्या सेवांविषयीची माहिती ऑनलाइन पडताळून पाहू शकतात.

Murud Beach Tourism
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

चॅटबॉट सध्या इंग्रजी आणि हिंदीमध्ये मदत पुरवतो. लवकरच मराठी आणि कोकणी भाषांचाही समावेश केला जाईल, अशी माहिती पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्याने दिली. सुरुवातीला बीटा आवृत्ती म्हणून प्रसिद्ध करण्यात आलेला हा चॅटबॉट, गोवा पर्यटन खात्याच्या अधिकृत वेबसाइट आणि जीटीडीसी पोर्टलवर उपलब्ध आहे.
पर्यटनाची पुनर्रचना करण्यासाठी डिजिटल अजेंडा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेखाली आयोजित या बैठकीत, पर्यटनामध्ये तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर चर्चा करण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तरुण पर्यटन उत्साही, कंटेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स, पर्यटन क्षेत्रातील हितधारक आणि उद्योग प्रतिनिधी एकत्र आले होते.

Murud Beach Tourism
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

हे चॅटबॉट प्रमाणित निवास व्यवस्था, सांस्कृतिक अनुभव, स्थानिक आणि आंतरराज्यीय वाहतूक आणि जीटीडीसी सेवासंबंधीच्या प्रश्नांना प्रतिसाद देते. तसेच, हे वापरकर्त्यांना जीटीडीसी हॉटेल्स आणि नोंदणीकृत खासगी निवासस्थानांबद्दल मार्गदर्शन करते आणि यामध्ये चौकशी तिकिटे तयार करण्याची व त्यांचा मागोवा घेण्याची सुविधा समाविष्ट आहे, असे अधिकारी म्हणाले.

तंत्रज्ञानाचा वापर करा:

"पर्यटनाचे भविष्य तुमच्या खिशातील फोनवर, ते फोन हातात धरलेल्या लोकांकडून ठरवले जात आहे," असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले. त्यांनी तरुणांना आवाहन केले की, त्यांनी गोव्याकडे कल्पना, व्यवसाय आणि करिअर घडवण्याचे ठिकाण म्हणून पाहावे आणि पर्यटक, स्थानिक समुदाय व पर्यटन व्यवसायांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news