Goa Tourism Old Ferry Boats | जुन्या फेरीबोटींचे तरंगते रेस्टॉरंट, डिजिटल नोमॅड हबमध्ये रुपांतर

Goa Tourism Old Ferry Boats | या उपक्रमामुळे राज्याच्या पर्यटन क्षेत्राला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Adpai Ferry boat
Goa Adpai Ferry boat file phtoto
Published on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पर्यटन खात्याने वापरातून बाद झालेल्या जुन्या फेरीबोटींचा नव्या पद्धतीने उपयोग करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांचे तरंगते रेस्टॉरंटस् आणि डिजिटल नोमॅड वर्कस्पेसेसमध्ये रुपांतर करण्याचे ठरविले आहे.

Adpai Ferry boat
Sindhudurg Museum | सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मिळणार आंतरराष्ट्रीय आयाम !

या उपक्रमामुळे राज्याच्या पर्यटन क्षेत्राला नवी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येणार असून, त्यासाठी पर्यटन खात्याने इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत.

राज्यातील जलमार्गाचा पर्यटनासाठी अधिक प्रभावी वापर करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. प्रस्तावानुसार, जुन्या फेरीबोटींचे रूपांतर आधुनिक सुविधा असलेल्या तरंगते रेस्टॉरंटस्, कॅफे, मनोरंजन केंद्रे तसेच डिजिटल नोमॅड्ससाठी कामकाजाच्या जागांमध्ये केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news