Goa Tourism 2025 | राज्यात दहा महिन्यांत 75 लाख पर्यटक

Goa Tourism 2025 | गोवा हीच अजूनही पर्यटकांची पहिली पसंती : देशी पर्यटकांचा ओघ वाढताच
Goa
Goa
Published on
Updated on

पणजी : विठ्ठल गावडे

पारवाडकर गोवा हे जागतिक पर्यटनाचे केंद्र आहे. विशेषतः भारतातील कुणीही व्यक्ती ज्यावेळी पर्यटनाला जाण्याचा विचार करते त्यावेळी त्यांचे गोवा हे पहिल्या पसंतीचे स्थळ असते. एका बाजूला जगभर गोवा पर्यटन क्षेत्र म्हणून लौकीक मिळवत असताना काही घटनांमुळे व पर्यटन व्यावसायिकांनी सुरू केलेल्या दादागिरीमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राची बदनामी होत आहे.

Goa
Unity Mall Goa | युनिटी मॉल प्रकल्प बफर झोनबाहेरच; पर्यटन खात्याचे स्पष्टीकरण

गोव्यात २०२५ या वर्षाचा पर्यटन क्षेत्रातील मागोवा घेताना विचार केल्यास काही गोष्टी सकारात्मक आहेत, तर काही नाकारात्मक आहेत. पर्यटन क्षेत्रासाठी घडलेल्या सकारात्मक घटनांचा विचार करता गोव्यातील अंतर्गत भागातील पर्यटन क्षेत्राचा झालेला विकास, गोव्याला प्राप्त झालेले बेस्ट रोमँटिक डेस्टीनेशन, बेस्ट मेरेज डेस्टीनेशन, पॉझीटिव्ह टुरीझम डेस्टीनेशन आदी पुरस्कार, आध्यात्मिक पर्यटन केंद्रासाठी सुरु झालेले प्रयत्न आदी साकारात्मक घटना म्हणाव्या लागतील.

मात्र, हडफडे येथील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा झालेला मृत्यू, रॉकचालकांनी केलेल्या मारहाणीत एका पर्यटकाचा व एका स्थानिकाचा झालेला मृत्यू या घटनांसह, दलालाकडून व क्लब चालकाकडून होणारी पर्यटकांची लुटमार आणि टॅक्सीचालकांसह अस्थापनांचालकाकडून घेतले जाणारे वाढीव शुल्क आदी गोष्टींचा समावेश आहे.

स्थानिक युवकावर हल्ला झाला व या वर्षातील सर्वात मोठी दुर्घटना म्हणजे हडफडे येथील नाईट क्लबला आग लागून त्यामध्ये २५ जणांचा झालेला मृत्यू. महत्वाचे म्हणजे हा क्लब बेकायदेशीर सुरू होता. आणि असे बेकायदेशीर क्लब वर्षांनुवर्षे सुरू आहेत. या घटनेमुळे गोव्याचे पर्यटन क्षेत्र हादरून गेले.

वर्षाच्या सुरुवातीला ३ जानेवारीला एका शॅकच्या कर्मचाऱ्यांकडून पर्यटक कुटुंबाला मारहाण करण्यात आली. त्यामध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झाला. त्यानंतर २८ जानेवारीला शंकमध्ये एका त्यात ज्याचा जीव गेला. त्याचबरोबर काही चांगल्या गोष्टी पर्यटन क्षेत्रात साठी घडल्या आहेत गोवा पर्यटन खात्याला विविध विभागात वारंवार मिळणारे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार, गोव्यात सुरु झालेले तीर्थ कोटी व आध्यात्मिक पर्यटनाचे उपक्रम, होम स्टे मुळे ग्रामीण पर्यटनाला मिळालेली चालना या सकारात्मक गोष्टी आहेत.

केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्यामुळे गोव्याला पर्यटन क्षेत्रांमध्ये भरीव सुधारणा करण्यासाठी करोडो रुपयांचे अनुदान केंद्राकडून मिळाले. त्याच्या साहाय्याने पर्यटनस्थळी, किनारी भागात अनेक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. अनेक नवे प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकाना आनंददायी पर्यटनाचा लाभ घेता येत आहे.

गोवा एक सुसंस्कृत आणि सांस्कृतिक, आध्यात्मिक राज्य आहे, या त्यादृष्टीने गोव्याचा पर्यटन विकास सध्या होताना दिसतोय. नार्वे येथील तीर्थाचा विकास, पणजी येथील मांडवी किनारी परशुरामाचा भव्य पुतळा उभारतानाच त्याच भागांमध्ये योग सेतू आणि योग केंद्र स्थापन झाले आहे. अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करून आणि सुशोभीकरण करून पर्यटकांना आकर्षित केले जात आहे.

नकारात्मक घटना

हडफडे येथील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जणांचा झालेला मृत्यू, शॅकचालकांनी केलेल्या मारहाणीत एका पर्यटकाचा व एका स्थानिकाचा झालेला मृत्यू या घटनांसह दलाल व क्लब चालकांकडून होणारी पर्यटकांची लुटमार, किनारी भागात बेकायदेशीरपणे चालणारे क्लब आणि टॅक्सीचालकांसह अस्थापनांचालकाकडून घेतले जाणारे वाढीव शुल्क आदी गोष्टींचा समावेश आहे.

सकारात्मक घटना...

पर्यटन क्षेत्रासाठी घडलेल्या सकारात्मक घटनांचा विचार करता गोव्यातील अंतर्गत भागांतील पर्यटन क्षेत्राचा विकास, गोव्याला प्राप्त झालेले बेस्ट रोमँटिक डेस्टीनेशन, बेस्ट वेडिंग डेस्टीनेशन, डेस्टीनेशन ऑफ द एअर ट्रावेल अॅवार्ड, चाणक्य आवार्ड गोवा बियोंड बिचेस, पॉझिटीव्ह टुरिझम डेस्टीनेशन, टुरिझम मिनिस्टर ऑफ द एअर रोहन खंवटे, बेस्ट फॅमिली डेस्टीनेशन, बेस्ट डेस्टीनेशन फॉर रिसोर्ड वेडिंग, आदी पुरस्कारांसह आध्यात्मिक पर्यटन केंद्रासाठी सुरू केलेले उपक्रम, अंतर्गत पर्यटन वाढीसाठी सुरू केलेली होम स्टे योजना या गोव्याच्या पर्यटन क्षेत्रातील वर्षभराच्या सकारात्मक गोष्टी आहेत.

Goa
Night Club Fire Case | चौकशी अहवालात सरकारला 60 शिफारशी

टॅक्सी व्यावसायिक केव्हा जागेवर येणार?

गोवा हे जागतिक पर्यटनाचे केंद्र आहे आणि येथे आल्यानंतर फिरण्यासाठी रेंट बाईक, रेट अ कार आणि पर्यटक टॅक्सी यांचा वापर सातत्याने पर्यटक करतात. गोव्यातील टॅक्सी चालक नव्या सुधारणाना कधीच पाठिंबा देत नाहीत. त्यामुळे सर्व पर्यटक टॅक्सीना मीटर बसवण्याचे सरकारचे अथक प्रयत्न यशस्वी होत नाहीत.

सरकार आणि टॅक्सीचालक यांच्याच वारंवार संघर्ष होत आहे. टॅक्सीचालकांनी नव्या सुधारणांचा अंगिकार करावा. ऑनलाईन सेवा स्वीकारावी. न पेक्षा त्यांच्यावर जादा शुल्क आकारले जाते असा आरोप होतच राहणार असून त्याचा परिणाम पर्यटन संख्या घटण्यावर होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news