Goa TCP land | राज्यातील 51,678 चौमीपेक्षा जास्त भूपरिवर्तन करणार टीसीपीची योजना

Goa TCP land | वसाहत क्षेत्रात रूपांतरासाठी २२ प्रस्तावांना मंजुरी
Land
LandPudhari
Published on: 
Updated on: 

पणजी (पुढारी वृत्तसेवा):

गोवा नगर आणि नियोजन (टीसीपी) मंडळाने विविध विद्यमान क्षेत्रांमधील जमीन वसाहत क्षेत्रात रूपांतरित करण्याच्या २२ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे, ज्यामध्ये ५१,६७८ चौ.मी. क्षेत्राचा समावेश आहे. राजपत्रकात अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तीस दिवसांत जनता सूचना किंवा आक्षेप सादर करू शकते.

Land
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

या प्रस्तावांमध्ये सध्या नैसर्गिक आच्छादन, फळबाग, भातशेती, खाजगी जंगल व औद्योगिक क्षेत्र म्हणून वर्गीकृत केलेल्या जमिनीचा समावेश आहे. यात सर्वात मोठा प्रस्ताव धारगळ येथे असून तो १९,१७५ चौ. मी.चा आहे. त्यानंतर हडफडे (१३,७०० चौ.मी.) आणि हणजूण (११,५१० चौ.मी.) येथील प्रस्ताव आहेत.

'गोवा नगर नियोजन (प्रादेशिक योजना किंवा बाह्यरेखा विकास योजनेतील जमिनीच्या क्षेत्रात बदल) नियम, २०२४' च्या नियम ४(१) अंतर्गत गोवा टीसीपी मंडळासमोर ठेवण्यापूर्वी या प्रस्तावांची त्यांच्या संबंधित छाननी अहवालांसह तपासणी करण्यात आली.

Land
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

सूचना, आक्षेप सादर करण्याचे आवाहन

अधिसचनेनुसार, हे प्रस्ताव जनतेकडून मिळालेल्या कोणत्याही सूचनांसह नियमांच्या नियम ४(३) अंतर्गत पुढील शिफारस, मंजुरी किंवा निर्णयासाठी मंडळासमोर ठेवले जातील. हे प्रस्ताव प्रादेशिक योजना कक्ष, तिसवाडी तालुका कार्यालय, नगर आणि ग्राम नियोजन विभाग, कामत टॉवर, पाचवा मजला, पाटो-पणजी येथे सार्वजनिक तपासणीसाठी उपलब्ध आहेत.

इच्छुक व्यक्ती अधिकृत राजपत्रकात अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या ३० दिवसांच्या आत मुख्य नगर नियोजक (नियोजन), दुसरा मजला, धेंम्पो टॉवर, पाटो प्लाझा, पणजी यांच्याकडे आपल्या सूचना किंवा आक्षेप लिखित स्वरूपात सादर करू शकतात, असे मंडळाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.