Goa Anjuna Salaulim Modernization Proposal | अंजुणे, साळावलीच्या आधुनिकीकरणासाठी हजार कोटींचा केंद्राकडे प्रस्ताव : मंत्री शिरोडकर

अंजुणे, साळावलीच्या आधुनिकीकरणासाठी हजार कोटींचा केंद्राकडे प्रस्ताव : मंत्री शिरोडकर
मंत्री सुभाष शिरोडकर
मंत्री सुभाष शिरोडकर
Published on: 
Updated on: 

पणजी : गोवा सरकारने सत्तरी येथील अंजुणे धरणाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्राकडे ३०० कोटी रुपये, तर सांगे येथील साळावली धरणाच्या आधुनिकीकरणासाठी ६०० ते ७०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. या कामांमुळे राज्याची पाणी साठवण क्षमता वाढण्यास मदत होणार आहे. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी याबाबत माहिती दिली.

मंत्री शिरोडकर यांनी सांगितले की, पाण्याच्या काटकसरीने वापर आणि पुनर्वापरावर भर दिला. इस्रायलच्या धर्तीवर ठिबक सिंचनाला प्रोत्साहन देण्याची सरकारची योजना आहे. तसेच पाण्याचा वापर नियंत्रित करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर १०० घरांमध्ये सेन्सर बसविण्यात येणार आहेत. ओपा जलशुद्धीकरण प्रकल्पावरील ताण कमी करण्यासाठी साळावली ते पंचवडी येथे अतिरिक्त १५ ते २० एमएलडी पाणी शुद्धीकरणासाठी वळविण्यात येणार आहे.

मंत्री सुभाष शिरोडकर
Illegal Liquor Transport : गोवा बनावटीची २६७ लिटर दारू जप्त

याशिवाय साळावली येथे १०० एमएलडी क्षमतेचा अतिरिक्त प्रकल्प नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. आणखी तीन जलशुद्धीकरण प्रकल्पांचे कामही सुरू आहे. यंदा गोव्यात ३२ टक्के पावसाची तूट असली, तरी ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरेल इतका कच्च्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मार्चअखेरपर्यंत भात कापणी

तिसवाडी आणि फोंडा या तालुक्यांना धरणाच्या पाण्याची सुविधा नसल्याने तेथील पाणीपुरवठा व्यवस्थेवर अधिक ताण येत आहे. दरम्यान, भातशेतीची लागवड वेळेत सुरू करून मार्चअखेरपर्यंत कापणी पूर्ण व्हावी, यासाठी कृषी विभागाला आवश्यक सूचना देण्यात येणार असल्याचेही मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

मंत्री सुभाष शिरोडकर
Goa Cabinet Expansion | अखेर संकल्प आमोणकर यांचा गोवा मंत्रिमंडळात बारावे मंत्री म्हणून समावेश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.