Goa - विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची रणनीती

शिवसेना (शिंदे गट) गोवा राज्य कोअर समितीची मुंबईत बैठक
मुंबई: शिवसेना (शिंदे गट) गोवा राज्य कोअर समितीची बैठकीत उपस्थित संपर्कप्रमुख सुभाष सावंत, राज्य समन्वयक अरुण मोरे व इतर.
मुंबई: शिवसेना (शिंदे गट) गोवा राज्य कोअर समितीची बैठकीत उपस्थित संपर्कप्रमुख सुभाष सावंत, राज्य समन्वयक अरुण मोरे व इतर.
Published on
Updated on

पणजी : शिवसेना (शिंदे गट) गोवा राज्य कोअर समितीची बैठक नुकतीच मुंबईत झाली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यात आली.

मुंबई: शिवसेना (शिंदे गट) गोवा राज्य कोअर समितीची बैठकीत उपस्थित संपर्कप्रमुख सुभाष सावंत, राज्य समन्वयक अरुण मोरे व इतर.
Ratnagiri ZP School Exam | यंदा पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा

राज्य शिवसेना प्रमुख उपेंद्र गावकर यांनी सांगितले की, शिवसेना पक्षाचे सर्वोच्च नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवलेल्या ध्येय-धोरणांनुसार गोवा राज्यात पक्षाचा विस्तार करण्यासाठी शिवसेना गोवा राज्य कोअर समितीची महत्त्वपूर्ण बैठक गोरेगाव मुंबई येथील कार्यालयात पार झाली. ही बैठक शिवसेना संपर्कनेते तथा धोरण समिती प्रमुख गजानन कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

बैठकीत आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी, प्रचार यंत्रणा, विविध समित्यांची स्थापना आणि जबाबदाऱ्यांचे वाटप यावर सखोल चर्चा करून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीला संपर्कप्रमुख सुभाष सावंत, राज्य समन्वयक अरुण मोरे, गोवा राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, सरचिटणीस काशिनाथ मयेकर, राजू पेडणेकर, दिलीप नाईक, गिरीश लोटलीकर सुनील सांतीनेजकर, गणबा नाईक देसाई, सुहास खांडोळकर, सुजाता मोरजकर, शुभांगी च्यारी, मिलिंद प्रधान, प्रकाश पावसकर, शिवप्रसाद भामरे, सुप्रिया करंडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. आगामी निवडणुकीसाठी पक्षाचा अधिकृत 'वचननामा' निश्चित करण्यासाठी एक विशेष 'वचननामा समिती' गठीत करून त्याचा कच्चा मसुदा करण्याचा निर्णय घेण्यात करताना गजानन कीर्तिकर यांनी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने विजय मिळवण्यासाठी सर्व प्रमुखांनी व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन केले.

मुंबई: शिवसेना (शिंदे गट) गोवा राज्य कोअर समितीची बैठकीत उपस्थित संपर्कप्रमुख सुभाष सावंत, राज्य समन्वयक अरुण मोरे व इतर.
Goa cabinet expansion - लवकरच मंत्रिमंडळ विस्तार शक्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news