Goa News : सेवा पंधरवड्यानिमित्त 17 पासून राज्यभर विविध उपक्रम

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
Goa Real Estate Prices Drop
डॉ. प्रमोद सावंत.(Pudhari File Photo)
Published on
Updated on

पणजी ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 17 सप्टेंबर आणि महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर या दोन विशेष दिवसांचे औचित्य साधून राज्यात बुधवार दि. 17 सप्टेंबर ते गुरुवार दि. 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा होणार आहे. या पंधरवड्यात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, ‘एक पेड माँ के नाम’, युवा परिसंवाद, वोकल फॉर लोकल विविध उपक्रम आयोजित केला आहे.

पंधरवड्यातील महत्त्वाचे कार्यक्रम

17 सप्टेंबर : पणजी कला अकादमी येथे 1000 स्वयंसहाय्य गटांना 63 कोटींचे कर्ज वाटप व गौरव. दि. 18-खेलो गोवा सेंटर अंतर्गत क्रीडा विभागाचा कार्यक्रम, फोंडा. दि. 19-पब्लिक ग्रीव्हन्सीस कार्यक्रम उद्घाटन. दि. 22-मच्छीमार खात्याचा कार्यक्रम, रवींद्र भवन वास्को - योजनांची माहिती व अनुदान वितरण. दि. 23-समाज कल्याण खात्याचा कार्यक्रम, पणजी. दि. 24-पशुसंवर्धन विभागाचा कार्यक्रम, डिचोली. दि. 25-रस्ता सुरक्षा व अमली पदार्थ नियंत्रणावरील कार्यक्रम, पणजी (पोलिसांतर्फे). दि. 26-गेडा तर्फे सौर ऊर्जा विषयक कार्यक्रम. 27-आदिवासी कल्याण खात्याचा कार्यक्रम, काणकोण. दि. 28- कृषी विभागाचा कार्यक्रम, धारबांदोडा. दि. 29-कौशल्य विकास खात्याचे कार्यक्रम, डिचोली व पणजी. दि. 30-महिला व बालकल्याण खात्याचा कार्यक्रम, कुडचडे. दि. 31-पेडणे महाविद्यालयात ‘विकसित भारत’ मार्गदर्शन कार्यक्रम. दि. 2 ऑक्टोबर : खांडोळा महाविद्यालयात विशेष कार्यक्रम.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news