Mankurad Mango Farming | गोव्यात आंब्याचे उत्पादन 9 टक्क्यांनी वाढले; 'मानकुराद' आंब्याला ग्राहकांची सर्वाधिक पसंती!

Mankurad Mango Farming | उत्पन्न नऊ टक्क्यांनी वाढले; मानकुरादला सर्वाधिक पसंती
Konkan Mango Farming
Konkan Mango FarmingPudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आंबा हा फळांचा राजा मानला जातो. गोव्यात गेल्या तीन वर्षांत आंब्याच्या लागवडीत आणि उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. कृषी संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या कालावधीत आंब्याच्या लागवडीत दीड टक्क्याने, तर उत्पादनात ९ टक्क्यांनी वाढ झाली.
२०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षांत गोव्यात एकूण १५,३९५ हेक्टर क्षेत्रावर ३१,५१२ टन आंब्याचे उत्पादन झाले.

Konkan Mango Farming
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

राज्यात दरवर्षी सरासरी ५ हजार हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड होते आणि सुमारे १० हजार टन उत्पादन मिळते. २०२३-२४ मध्ये ५,०९० हेक्टर क्षेत्रावर १०,०७९ टन उत्पादन झाले. २०२४-२५ मध्ये लागवडीचे क्षेत्र ५,१४९ हेक्टरवर, तर उत्पादन १०,४५० टनांवर पोहोचले. २०२५-२६ मध्ये लागवड ५,१५६ हेक्टरवर आणि उत्पादन १०,९९३ टनांवर गेले.

म्हणजेच २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये लागवडीत ५९ हेक्टर आणि उत्पादनात ३७१ टनांची वाढ झाली. त्यानंतर २०२५-२६ मध्ये लागवडीत आणखी ७ हेक्टर, तर उत्पादनात ५४३ टनांची वाढ झाली.

राज्यातील सर्व १२ तालुक्यांत आंब्याची लागवड केली जाते. त्यात प्रसिद्ध 'मानकुराद' आंब्याचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यंदाच्या हंगामात उत्तर गोव्यात १,११९ हेक्टर, तर दक्षिण गोव्यात ४,०३७ हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news