

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गोव्यातील उत्तर व दक्षिण भागातील काही परिसरात देखभाल दुरुस्ती कामांसाठी नियोजित वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. उत्तर गोव्यात १२ जानेवारी रोजी केव्हीए कुर्बाणी बार डीटीसी, पर्वरी येथे सकाळी १० ते दुपारी ४.३० या वेळेत वीजपुरवठा बंद राहणार आहे.
या काळात हाळीवाडा, श्री सातेरी मंदिर परिसर, मेंडेस कार वॉशिंग सेंटर तसेच आजूबाजूचे भाग प्रभावित होणार आहेत. दक्षिण गोव्यात १३ जानेवारी रोजी ११ केव्ही असोळणा येथे सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात बैनफॉल, कार्मोना पूल, मुळेवाड, ओरेल, असोळणा चर्च, गिंदे अपार्टमेंटस्, सांतावाडा व तारीवाड या भागात वीजपुरवठा बंद राहील. संबंधित नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन वीज खात्याने केले आहे.