Goa - सांकवाळ सरपंच, उपसरपंच निवडीचा वाद

सांकवाळ सरपंच, उपसरपंच निवडीचा वाद न्यायालयात सात पंचांची खंडपीठाकडे याचिका : ५ मे रोजी होणार सुनावणी
Court
न्यायालय Pudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : सांकवाळ पंचायतीमध्ये रिक्त असलेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी पंचायत संचालक नोटीस बजावण्यासाठी चालढकलपणा करत असल्याचा आरोप करत सात पंचसदस्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकादाराच्या वकिलांनी ही बाब लक्षात आणून दिल्यावर सुनावणी ५ मे २०२६ रोजी ठेवली आहे.

Court
Goa Valpoi | वाळपईत नळाच्या पाण्यामध्ये आढळले किडे

पंचायतीच्या अकरा सदस्यांपैकी तुळसीदास नाईक, मारिया आझावेदो, निधी नाईक, रोहिणी तोरस्कर, व्हॅलेंटो रॉड्रिग्स आणि जैसिया कादर या सहा पंचसदस्यांनी सरपंच अनुषा लामानी आणि उपसरपंच डेरिक वालेस यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडून तो संमतही झाला होता. पंचायतीचे कामकाज आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेबाबत असलेल्या असंतोषाचे कारण देत हा ठराव मांडण्यात आला होता, त्यामुळे सरपंच व उपसरपंच पद रिक्त झाले आहे.

ही पदे भरण्यासाठी निवडणुकीची नोटीस बजावण्याची मागणी पंचायत संचालकांना करण्यात आली. मात्र, त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. ही पदे रिक्त असल्याने पंचायतीची अनेक कामे अडून राहिली आहेत व लोकांचे विविध कामांच्या परवान्यासाठी केलेले अर्ज पडून आहेत. त्यामुळे ही निवडणूक घेण्याचे निर्देश खंडपीठाने द्यावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

Court
Goa call center racket - कॉल सेंटर रॅकेटचा पर्दाफाश; सांतिनेज, दोनापावला येथे छापे

पंचायत संचालकांनी सांकवाळ पंचायतीवर सरपंच व उपसरपंच पदे भरण्यासाठी लवकर निवडणूक घेण्याऐवजी पंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. हा प्रशासक फक्त दैनंदिन काम पाहत असून त्याला निर्णय घेण्याचा अधिकार नाही. या पंचायतीला पूर्णवेळ सचिवही नाही. कामे खोळंबली असल्याचा दावा करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news