Goa raod accident | Googleने रस्ता चुकवला; चालकाने मृत्यू परतवला

लोकेशनने त्याचा रस्ता चुकवला; पण चांगल्या वेळेने मृत्यू परतवला.
Goa raod accident
Goa raod accident
Published on
Updated on

पणजी : कुंढईहून हैदराबादकडे टूथपेस्ट घेऊन जाणारा दहाचाकी ट्रक लाडफे आणि लाटबार्से सीमेवरील सोनारभाट येथे एका वळणावर डाव्या कुशीवर कोसळला. चालक उमेश कुमार (रा. उत्तर प्रदेश) याने हा अपघात गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास झाल्याचे सांगितले.

मी गुगल लोकेशनवरून ट्रक घेऊन कुंढईतून निघालो. पहिल्यांदा लोकेशनप्रमाणे मी गेलो असता एका कमी उंचीच्या पुलाजवळ पोहोचलो. त्या पुलाखालून ट्रक जाणार नसल्याने मी यू टर्न मारून दुसऱ्या रस्त्याने आलो. तेव्हा हा रस्ता दाखवण्यात आला. याठिकाणी वळणावर पोहोचल्यावर मी ब्रेक दाबला. मात्र, ब्रेक लागेना. त्यामुळे ट्रक रस्ता सोडून बाहेर गेला व डाव्या कुशीवर कोसळला. यावेळी त्याने ट्रकमध्ये १८ टन टूथपेस्ट असल्याची माहिती दिली.

... अन् मृत्यू माघारी फिरला

रस्ता सोडून बाहेर गेलेला ट्रक विजेच्या सिमेंटच्या खांबाला धडकला. चालकाने प्रसंगवधान राखल्याने खांब अर्धवट तुटला. पण, खाली कोसळला नाही. तो कोसळला असता, तर चालक विजेच्या धक्क्याने मृत्यू पावला असता, तसेच ट्रकमध्ये तो एकटाच होता. क्लीनर नव्हता. तो असता, तर ट्रकखाली सापडून तोही मृत्युमुखी पडला असता. लोकेशनने त्याचा रस्ता चुकवला; पण चांगल्या वेळेने मृत्यू परतवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news