Srinivas Nayak Case | गोव्यातील पर्वरी गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! कथित शूटरचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

Srinivas Nayak Case | कथित शूटरच्या व्हायरल व्हिडिओने खळबळ : सत्यता पडताळणी सुरू
shooting case
shooting casePudhari Photo
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
पर्वरी येथील गोळीबार प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणातील कथित शूटरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात त्याने मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांनीच या संपूर्ण गोळीबाराचा कट रचल्याचा गंभीर आरोप केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात नायक यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

shooting case
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

या प्रकरणाचा तपास करत असलेल्या क्राईम ब्रँचचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी हा व्हिडिओ तपास यंत्रणेचे लक्ष विचलित करण्यासाठी कथित संशयित सामान्यतः अशा युक्त्यांचा अवलंब करतात. या प्रकरणात निष्पक्ष व निःपक्षपाती तपास सुरू आहे. गोवा क्राईम ब्रँचने या व्हिडिओला तपासाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

तपास यंत्रणांचे लक्ष सुरू असलेल्या तपासापासून दुसरीकडे वळविणे आणि तपासात संभ्रम निर्माण करणे हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यामागील उद्देश असू शकतो, असे क्राईम ब्रँचकडून स्पष्ट केले आहे. 'नॅशनल क्राईम रेस्क्यूअर' या यूट्यूब चॅनेलवर कथित शूटर याचा कथित व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याने आपले नाव अलपराज नाडा असे सांगितले आहे. त्यामुळे क्राईम ब्रँचने अटक केलेला एक शूटर बाबू असर अली याच्याकडून या नाडा याची माहिती मिळवत आहेत.

दुसरा शूटर तोच आहे का? याचाही शोध पोलिस घेत आहेत. या व्हिडिओमध्ये कथित शूटरने नायक यांच्याविरोधात अनेक आरोप केले आहेत. पर्वरीमधील गोळीबाराची घटना ही पूर्वनियोजित 'ड्रामा' असल्याचा दावा त्याने केला आहे. नायक यांच्यावर त्यानेच गोळी झाडली असली तरी एकमेकांविरुद्ध क्रॉस फायरिंग करण्याचे नियोजन नायक यांनी आखले होते. त्यामुळेच एक ते दोन मीटरवर असूनही नायक यांच्यावर गोळी झाडण्यात आली नाही तर बाजूला गोळ्या झाडण्यात आल्या.

तसेच त्यांचा अंगरक्षकही जवळच होता, त्यानेही माझ्यावर गोळी न झाडता बाजूला गोळीबार केला. यावरून हे गोळीबार फक्त नाटक होते, असा दावा व्हिडिओत नाडा याने केला आहे.
दरम्यान, कथित शूटरच्या व्हिडिओमधील आरोपांची सत्यता तपास यंत्रणांकडून पडताळली जात आहे. मात्र, व्हिडिओच्या आधारे तपासाची दिशा बदलणार नसून, उपलब्ध पुरावे आणि तपासातून समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारेच पुढील कारवाई केली जाईल, अशी भूमिका क्राईम ब्रँचकडून घेण्यात आली आहे.

पैशाचे आमिष?

पर्वरी गोळीबाराच्या नाटकासाठी एक कोटी रुपये देण्याचे नायक यांनी ठरवले होते. या घटनेपूर्वी गेले वर्षभर तो निओ मॅजेस्टिक कॅसिनो हॉटेलच्या बाहेर येऊन पैसे घेऊन जात होता. त्याला २५ लाख रुपये त्याच्याकडून मिळाले होते. पैशाच्या आमिषापोटी हे नाट्य केल्याची कबुली तो देत आहे. हॉटेलात मी येतानाचे सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा बंद झालेले असणार त्याचा पोलिसांनी तपास करावा, अशी विनंतीही त्याने केली आहे.

'अण्णा'सह दोघे गजाआड

पर्वरी येथील निओ मॅजेस्टिक प्रकरणातील गोळीबार प्रकरणी क्राईम ब्रँचने चेन्नईतील लाईट हाऊस पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत अर्पुथराज उर्फ अण्णा नडार (वय ४९) आणि पवन सौर (१९) या दोघांना चेन्नईत अटक करून गोव्यात आणले. त्यांना म्हापसा न्यायालयाने चार दिवसांची कोठडी दिली आहे.
या कारवाईमुळे या प्रकरणात अटक केलेल्या संशयितांची संख्या सहावर पोहोचली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अर्पुथराज उर्फ अण्णा हा या प्रकरणातील दुसरा शूटर असल्याचे तपासात समोर आले आहे. यापूर्वी या गोळीबारातील शूटर बाबू अली याला दोन दिवसांपूर्वी नेपाळ सीमेवरून अटक केली होती.

shooting case
Babush Monserrate Panjim | मी पणजी सोडून कुठेही जाणार नाही! सांताक्रूझमधून लढण्याच्या चर्चांवर बाबूश मोन्सेरात यांचा पूर्णविराम

गोळीबाराच्या कटकारस्थानात सामील असलेल्या व सध्या पोलिस कोठडीत असलेल्या काजू शेख, इसार अली व सूरज आचार्य या तिघांना अटक केल्यानंतर या दोन्ही शूटर्सची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून ही झटपट कारवाई झाली. अण्णा हा मूळचा तमिळनाडूतील तिरुनेलवेली जिल्ह्यातीलेडयांगुडी येथील रहिवासी असून, सध्या मुंबईतील दिघा रेल्वे स्थानकाजवळ राहत होता.

त्याच्यासोबत अटक केलेला पवन सौर हा मध्य प्रदेशातील टीकमगड जिल्ह्यातील असून, तोही मुंबईतील दिघा रेल्वे स्थानक परिसरात राहत होता.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पवन सौर हा या कटात सक्रियपणे सहभागी होता. त्यामुळे त्याची भूमिका, इतर संशयितांशी असलेले संबंध, तसेच गोळीबाराच्या कटाची आखणी आणि अंमलबजावणीत त्याचा नेमका सहभाग याबाबत क्राईम ब्रँचकडून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news