Goa Politics : व्हॉटस्ॲ‌प चॅट व्हायरल; आरजीत खळबळ

पक्षांतर्गत संघर्षामुळे पक्षाच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह
मनोज परब,  वीरेश बोरकर
मनोज परब, वीरेश बोरकर
Published on
Updated on

पणजी : रिव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाध्यक्ष मनोज परब यांच्या राजीनाम्यानंतर पक्षातील मतभेद तीव्र झाले असून, त्यांच्याविना पक्ष पदाधिकारी आणि आमदार वीरेश बोरकर यांची पहिली बैठक या आठवड्यात घेण्यात येणार असल्याची माहिती खजिनदार अजय खोलकर यांनी दिली. यातच पक्षाच्या सीईसी व्हॉटस्ॲ‌प गटातील चॅट व्हायरल झाल्याने राज्यभरात पुन्हा खळबळ माजली आहे.

खोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मडगाव येथील बैठकीबाबत आमदार वीरेश बोरकर यांची अधिकृत पक्ष बैठकीत चौकशी करण्यात येणार आहे. बोरकर यांना बाजू मांडण्यासाठी विशेष संधी दिली आहे. दरम्यान, पक्षाध्यक्ष पदासंदर्भातील प्रश्नही चर्चेतून सोडवले जातील, असे संकेत खोलकर यांनी दिले. मात्र, पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी समूहातील व्हॉटस्ॲप संदेशाचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर परिस्थिती गुंतागुंतीची बनली आहे. या संदेशात आमदार बोरकर यांच्याविरोधात मनोज परब आणि इतर सदस्यांच्या टिप्पण्यांचा समावेश आहे. या चॅट्सबाबत खोलकर यांनी हा पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले असून, स्पष्टीकरण देण्यापूर्वी पक्षांतर्गत चर्चा करू, असे स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news