Goa Politics | दीपक ढवळीकरांनी पुन्हा पराभूत होण्यासाठी शिरोडातून लढावेच!

मंत्री सुभाष शिरोडकर यांचा इशारा
सहकार मंत्री सुभाष शिरोडकर
सहकार मंत्री सुभाष शिरोडकर
Published on: 
Updated on: 

पणजी : मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर हे २०१९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिरोडातून आपल्या विरोधात उभे राहिले होते. आपण भाजपचा उमेदवार होतो. ते मगोचे उमेदवार होते. त्यावेळी आपण त्यांचा पराभव केला होता. आता पुन्हा ते २०२७ मध्ये शिरोडातून आपल्या विरोधात लढणार असल्याचे सांगत आहेत, त्यांनी अवश्य शिरोडातून लढावे. त्यांचा दुसऱ्यांदा पराभव होईल, असा इशारा सहकार मंत्री तथा शिरोडाचे आमदार सुभाष शिरोडकर यांनी दिली.

पणजी येथे मंगळवारी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी दीपक ढवळीकर यांनी शिरोडातून लढण्याच्या केलेल्या घोषणेसंदर्भात शिरोडकर यांना विचारले असता ते बोलत होते. मंत्री शिरोडकर म्हणाले, शिरोडा मतदारसंघात आपले काम चांगले आहे. कार्यकर्ते व शिरोडातील मतदार आपल्या सोबत आहेत. त्यामुळे आपण शंभर टक्के निवडून येणार आहे.

भाजप व मगो युतीने असतानाही दीपक ढवळीकर शिरोडातून लढणार म्हणताहेत हे कसे काय, असा प्रश्न पत्रकारांनी शिरोडकर यांना विचारला असता, त्याबाबतचा निर्णय हायकमांड घेतील. आपण त्यावर काही बोलणार नाही, असे शिरोडकर यांनी स्पष्ट केले. दीपक ढवळीकर हे शिरोडात उभे राहिले तरी आपल्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.शिरोडाची जनता आपल्या सोबत आहे, ती दुसऱ्यादा त्यांचा पराभव करेल, असे शिरोडकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.