Goa Politicians AI Retro Style Look | गोव्याच्या राजकारण्यांचा 80 च्या दशकातील लूक! सोशल मीडियावर एआय फोटो ट्रेंडिंग

Goa Politicians AI Retro Style Look | 80 च्या दशकातील अनोख्या लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष
Goa Politicians AI Retro Style Look
Goa Politicians AI Retro Style Look
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा
सोशल मीडियावर सध्या ८० च्या दशकातील आठवणी जागवणाऱ्या एआय ट्रेंडची जोरदार चर्चा सुरू आहे. या ट्रेंडमध्ये राज्यातील राजकीय नेतेही सहभागी झाले असून, त्यांच्या ८० च्या दशकातील अंदाजातील एआय छायाचित्रे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

Goa Politicians AI Retro Style Look
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, कला आणि संस्कृती मंत्री डॉ. रमेश तवडकर, भाजप नेत्या सुलक्षणा सावंत, आमदार दिव्या राणे,

आमदार विजय सरदेसाई, आमदार वीरेश बोरकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी ८० च्या दशकातील आपले रूप एआयच्या माध्यमातून साकारून सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Goa Politicians AI Retro Style Look
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

हे नेते १९८० च्या काळात कसे दिसले असते, याची कल्पना या छायाचित्रांतून करण्यात आली आहे. नेत्यांच्या हेअरस्टाईल, पेहराव, चष्मा आणि त्या काळातील फॅशनचा अनोखा अंदाज या छायाचित्रांत पाहायला मिळत आहे. त्यांचे बदललेले रूप पाहून नेटकऱ्यांना ८० च्या दशकातील चित्रपट, कलाकारांची फॅशन आणि त्या काळातील वातावरणाची आठवण होत आहे.

राजकीय चर्चांपेक्षा नेतेमंडळींचा हा हलकाफुलका आणि वेगळा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यातील कोणाचा ८० च्या दशकातील लूक सर्वाधिक खुलून दिसतो, याबाबतही सोशल मीडिया वापरकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अनेकांनी हा ट्रेंड फॉलो करत आपापले फोटोही पोस्ट केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news