Hydroponic Drug | गोव्यात पोलिसांची मोठी कारवाई! 1 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

Hydroponic Drug | गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसी) पर्वरी येथे मोठी कारवाई करत १.०५२ किलो संशयित हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे.
Crime News
Crime News File Photo
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

गोवा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसी) पर्वरी येथे मोठी कारवाई करत १.०५२ किलो संशयित हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. या अमली पदार्थाची अंदाजे किंमत १ कोटी ५ लाख २९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी गुजरातमधील सुरत येथील रुचितकुमार वेकरिया (वय ३१) याला अटक करण्यात आली आहे.

Crime News
IFFI Goa | समुद्रकिनारा, चित्रपट आणि कलाप्रेम! इफ्फीच्या रंगात रंगली गोव्याची राजधानी पणजी

पर्वरी येथील हाऊसिंग बोर्ड कॉलनीत २३ आणि २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थाची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर एनसी पथकाने छापा टाकला. पोलिस उपनिरीक्षक विकेश हडफडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दोन स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत संशयिताची तपासणी केली.

पोलिसांनी केलेल्या झडतीत हिरवट रंगाचा पानांसह तसेच फुलोरा आणि फळधारणा असलेल्या गांजाच्या झाडांचा भाग असलेले एक पारदर्शक प्लास्टिक पॅकेट आढळले. त्याचे वजन १,०५२.९ ग्रॅम होते. हा अमली पदार्थ संशयिताच्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये लपवून ठेवण्यात आला होता.

Crime News
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

जप्त करण्यात आलेल्या पदार्थाची हायड्रोपोनिक गांजा म्हणून संशय व्यक्त करण्यात आला असून, त्याची अंदाजे बाजारातील किंमत १.०५ कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. जप्त केलेला अमली पदार्थ कुठून आणण्यात आला होता आणि या तस्करीच्या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास एनसी पोलिस करत आहेत. उपनिरीक्षक विकेश हडफडकर तपास करीत असून संशयिताच्या माध्यमातून अमली पदार्थ पुरवठ्याचे नेटवर्क शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.