Goa Fraud News | बनावट सर्पदंश प्रतिबंधक औषधप्रकरणी वितरकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

या प्रकरणी पणजी पोलीस स्थानकात फसवणूक व कॉपीराईट उल्लंघन अंतर्गत कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

पणजी : गोवा पोलिसांनी सांताक्रुझ येथील आरव फार्मा या औषध वितरण कंपनीविरुद्ध बनावट सर्पदंश प्रतिबंधक औषध पुरवठा केल्याप्रकरणी फसवणूक व कॉपीराईटचे उल्लंघन केल्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कंपनीच्या व्यवस्थापनाला चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी नोटीस पाठविली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित कंपनीने लायोफिलाईज्ड सर्पदंश प्रतिबंधक उत्पादकाबाबत चुकीची माहिती देत बनावट लेबल व पॅकेजिंगचा वापर केला. आरोग्य खात्याने या कंपनीला सुमारे ४.९ लाख रुपयांचा खरेदी निविदा आदेश दिला होता.

मात्र, नंतर हा साठा बनावट असल्याचे आढळून आले. या कंपनीने आरोग्य सेवा संचालनालयाची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ज्या आरोग्य केंद्रांना हे सर्पदंश प्रतिबंधक औषधांचे वितरण करण्यात आले आहे ते परत मागवण्यात आले आहे.

या प्रकरणी पणजी पोलीस स्थानकात फसवणूक व कॉपीराईट उल्लंघन अंतर्गत कंपनीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आरव फार्मा कंपनीकडून सुमारे १,०८० व्हायल्स जप्त करून प्रयोगशाळा तपासणीसाठी नमुने पाठवले आहेत. या गंभीर प्रकारामुळे सरकारी आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news