

पणजी : नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक व नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने गोवा पोलीस पुढील आठवडाभर पूर्णतः सतर्क झाले आहेत.
राज्यात सुरक्षितता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे हे पोलिसांचे मुख्य उद्दिष्ट असून अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अमली पदार्थांच्या पुरवठा साखळीवर तसेच मागणीवर लक्ष केंद्रित करत एक सुसूत्र आणि प्रभावी रणनीती आखण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या धोरणामुळे यापूर्वी विक्रमी प्रमाणात अमली पदार्थ जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले होते.
नववर्ष काळात नाईट लाईफ भाग, समुद्रकिनारे आणि पर्यटनस्थळांवर विशेष पथके तैनात करण्यात येणार आहेत. रात्रीच्या गस्तमध्ये वाढ करून काही ठिकानी नाकाबंदीही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, पणजी महापालिकेच्या नगर बाल समितीमार्फत हा निर्णय घेण्यात आला असून, गोवा पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या 'ट्रॅफिक वॉर्डन प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत ' विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही योजना जानेवारी २०२६ पासून राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे शाळांच्या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि वाहतूक शिस्त वाढण्यास मदत होईल, असा पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, आहे.
दरम्यान, दरम्यान, पणजीतील शैक्षणिक संस्थांच्या परिसरात वाहतूक शिस्त निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. लवकरच शालेय विद्यार्थ्यांना 'वाहतूक वॉर्डन' म्हणून नियुक्त करून गोवा पोलिसांना वाहतूक नियंत्रणात मदत करण्यास त्यांचा वापर केला जाणार आहे.