Goa Pink Force | पिंक फोर्स ठरली 'देवदूत'! 21 वर्षीय माता अन् 7 महिन्यांच्या बाळाचा पुलावरून वाचवला जीव

Goa Pink Force | बाळासह आत्महत्येचा प्रयत्न; महिला पोलिसांचे प्रसंगावधान
Goa Pink Force | पिंक फोर्स ठरली 'देवदूत'! 21 वर्षीय माता अन् 7 महिन्यांच्या बाळाचा पुलावरून वाचवला जीव
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका २१ वर्षीय महिलेचा आणि तिच्या ७ महिन्यांच्या बाळाचा जीव पिंक फोर्सच्या महिला पोलिसांनी वाचवला. हेड कॉन्स्टेबल सिधवी नाईक आणि मेघा फडते यांच्या तत्परतेमुळे आई मुलाचा जीव वाचला.

Goa Pink Force | पिंक फोर्स ठरली 'देवदूत'! 21 वर्षीय माता अन् 7 महिन्यांच्या बाळाचा पुलावरून वाचवला जीव
Subash Velingkar | उत्खनन केल्यास धर्मांतर, छळाचे पुरावे सापडतील : वेलिंगकर

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला पुलावर संशयास्पद हालचाल करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पिंक फोर्सचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीची गंभीरता ओळखून पोलिसांनी महिलेची समजूत काढत तिला बाळासह ताब्यात घेतले आणि आई-बाळाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, वैयक्तिक कारणांमुळे संबंधित महिला मानसिक तणावाखाली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून आवश्यक ती समुपदेशनाची मदतही देण्यात येत आहे. दरम्यान, पिंक फोर्सच्या या तत्पर आणि संवेदनशील कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news