

पणजी : गोव्यातील पाळोळे समुद्रकिनारा अशियातील सर्वोकृष्ट समुद्रकिनारा ठरला आहे. जगातील सर्वोत्तम २५ मध्ये ६ वे स्थान या समुद्रकिनाऱ्याने प्राप्त केले आहे. राज्याला गोल्बल बीच इंडेक्स २०२६ द्वारे ही घोषणा करण्यात आली. गोव्याच्या बीच आशियातील एकमेव समुद्रकिनारा ठरल्याने प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.
दक्षिण गोव्यातील पाळोळे बीचला आशियातील सर्वोत्तम समुद्रकिनारा म्हणून घोषित करण्यात आल्याने, गोव्याने आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण ओळख मिळवली आहे. ही जागतिक मान्यता पाळोळेचे वैशिष्ट्यपूर्ण नैसर्गिक सौंदर्य, स्वच्छ पाणी, नारळाच्या झाडांनी वेढलेला किनारा आणि शांत किनारी वातावरणाचा गौरव करते. कानाकोणातील एका नयनरम्य अर्धचंद्राकृती उपसागराच्या काठावर वसलेला हा समुद्रकिनारा आहे.
पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले की, पर्यावरण, समुदाय आणि सांस्कृतिक अस्मितेला महत्त्व देणाऱ्या सास्कृतिक अ पर्यटन स्थळाच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित आहे. अशा प्रकारची जागतिक मान्यता जबाबदार, पुनरुत्पादक पर्यटनाप्रति असलेल्या आमच्या वचनबद्धतेला अधिक दृढ करते, जिथे गोव्याला विशेष बनवणारी नैसर्गिक आणि सांस्कृतिक संपत्ती भावी पिढ्यांसाठी संरक्षित आणि जतन केली जाते, असे ते म्हणाले.
या मान्यतेमुळे दक्षिण गोव्याचे जगासमोर आणण्याची आणि प्रवाशांना किनारपट्टी अंतर्गत प्रदेश, सांस्कृतिक अनुभव अधिक जाणून घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याची संधी मिळते.
- केदार नाईक, संचालक पर्यटन खाते
गोमंतकीयांसाठी अभिमानास्पद : खंवटे
पाळोळे बीचला मिळालेली ही आंतरराष्ट्रीय मान्यता गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. हे आपल्या किनारपट्टीचे नैसर्गिक सौंदर्य आणि जगभरातील प्रवाशांमध्ये गोव्याला एक अत्यंत आवडते पर्यटन स्थळ बनवणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव दर्शवते.