Goa Nightclub Fire | हडफडे नाईट क्लब अग्निकांड: १३ संशयितां विरुद्ध ४,१५० पानांचे आरोपपत्र दाखल

आरोपपत्रात ३०५ विविध साक्षीदारांच्या जबाबांची नोंद
Birch by Romeo Lane Arpora
Birch by Romeo Lane ArporaPudhari
Published on
Updated on

Birch by Romeo Lane Arpora

म्हापसा : हडफडे येथील बर्च बाय रोमियो लेन या नाईट क्लबमध्ये झालेल्या भीषण अग्निकांड प्रकरणी हणजूण पोलिसांनी १३ संशयित आरोपींविरुद्ध तब्बल ४१५० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. या आरोपपत्रात ३०५ विविध साक्षीदारांच्या जबाबांची नोंद करण्यात आली आहे.

हणजूण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ डिसेंबर २०२५ रोजी हडफडे येथील संबंधित नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत ५ पर्यटकांसह एकूण २५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी हणजूण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक नवनीत गोलेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.

Birch by Romeo Lane Arpora
Goa Nightclub Fire Case | "२५ जणांचा मृत्यू झाला तरी सरकार गंभीर नाही का?"; हडफडे नाईटक्लब आगीवरून खंडपीठाने झापले

तपासादरम्यान क्लबचे मालक, भागीदार, व्यवस्थापक, इव्हेंट आयोजक तसेच व्यवस्थापकीय कर्मचारी यांच्याविरुद्ध गंभीर निष्काळजीपणाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. क्लबमध्ये आवश्यक अग्निसुरक्षा यंत्रणांचा अभाव, आपत्कालीन बाहेर पडण्याच्या दरवाजाची सुविधा नसणे, तसेच आवश्यक परवान्यांशिवाय व्यवसाय सुरू ठेवणे आदी बाबी निदर्शनास आल्या. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलमे १०५, १२५, १२५ (अ), १२५ (ब), २८७ सह ३(५) तसेच ३३८, ३३६(३), ३४०(२), ६१(२), २३८, २४१, ३(७) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणी एकूण १३ संशयितांना अटक करण्यात आली आहे

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अजय गुप्ता (५५, रा. गुरुग्राम, हरियाणा) याला दिल्ली येथून अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. गौरव लुथरा (४४, रा. दिल्ली) व सौरभ लुथरा (४०, रा. दिल्ली) हे क्लबचे भागीदार असलेले भाऊ थायलंड येथून ताब्यात घेऊन भारतात आणण्यात आले. ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. हे तिघेही “मे. बिइंग जीएस हॉस्पिटॅलिटी गोवा आरपोरा एलएलपी” आणि “बर्च बाय रोमियो लेन” या बार अँड रेस्टॉरंटचे भागीदार-मालक आहेत.

राजीव मोडक (४९, रा. नवी दिल्ली) हा क्लबचा कॉर्पोरेट जनरल मॅनेजर असून तोही न्यायालयीन कोठडीत आहे. विवेक सिंग (२७, रा. उत्तर प्रदेश) (जनरल मॅनेजर) आणि विजयकुमार सिंग (३८, रा. झारखंड) यांनाही अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. विजयकुमार सिंग याला झारखंड येथून अटक करण्यात आली होती.

प्रियांशु ठाकूर (३२, रा. दिल्ली) (गेट मॅनेजर) आणि राजवीर सिंघानिया (३२, रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश) (बार मॅनेजर) हे दोघे जामिनावर मुक्त आहेत.

हडफडे-नागवा ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच रोशन रेडकर (४६, रा. हडफडे) तसेच तत्कालीन बडतर्फ पंचायत सचिव रघुवीर बागकर (४९, रा. मयडे) हे दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

मयूर कोलवाळकर (रा. आल्तो पर्वरी), के-डान्स इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक, तसेच मोहम्मद अफीफ अब्दुल साहब बातेरी (रा. आल्तो पर्वरी), के-डान्स इव्हेंट प्रायव्हेट लिमिटेडचा जनरल मॅनेजर, यांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Birch by Romeo Lane Arpora
Goa Nightclub Fire Case | हडफडेतील भीषण आग प्रकरणी दोषींना फाशी द्या; नाईट क्लब मालकांविरोधात संतप्त कुटुंबीयांचा आक्रोश

दरम्यान, बर्च बाय रोमियो लेन क्लबच्या जागेचे मालक ब्रिटिश नागरिक सुरेंद्र कुमार खोसला (७८, रा. हडफडे) हे सध्या फरार असून त्यांच्या विरोधात पोलिसांनी नॉन-बेलेबल अटक वॉरंट तसेच ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news