Goa Night Music Ban : गोवा राज्यात रात्री 10 नंतर संगीत बंदच

डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांची माहिती : केवळ मोठ्या उत्सावात मुभा
Goa Night Music Ban
Goa Night Music Ban
Published on
Updated on

पणजी ः सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशभरात रात्री 10 नंतर मोठ्याने संगीत वाजवण्यास बंदी आहे. ही बंदी गोव्यातही कायम आहे. गोव्यात चतुर्थी, शिमगोत्सव, ख्रिसमस अशा काही महत्त्वाच्या उत्सव काळातील 15 दिवसांच्या काळात रात्री 12 वाजेपर्यंत संगीत वाजवण्यास मुभा आहे. राज्यात ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, तसेच उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष डॉ. लेविन्सन मार्टिन्स यांनी दिला आहे.

पर्वरी येथे मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. मार्टिन्स बोलत होते. ते म्हणाले, ध्वनी प्रदषण, हवा प्रदूषण या बाबत हेल्पलाईनवर तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या-त्या भागातील उपविभागीय पोलिस अधिकारी, उपजिल्हाधिकारी आणि स्थानिक पोलिस ठाण्याला ई-मेलद्वारे माहिती पाठवली जाते. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याच्या पथकाने त्वरीत जाऊन प्रत्यक्ष जाऊन कारवाई करणे बंधनकारक आहे. अशी कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित केली जाईल. सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रम, विवाह समारंभ, मिरवणुका किंवा कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाच्या नावाखाली ध्वनी प्रदूषण सहन केले जाणार नाही. लोकांनी ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी 8956487938 या हेल्पलाईन क्रमांकावर कराव्यात असे आवाहन केले.

420 कि.मी. जागेतील कचऱ्याची उचल

प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे राज्यातील हमरस्ते व जिल्हा रस्त्यांच्या एकूण 420 कि.मी. अंतर रस्त्याकडेचा कचरा गोळा करते. त्यासोबत 191 पंचायती व 13 पालिका आणि एक महापालिका यांचा कचरा उत्तर व दक्षिण गोवा कचरा प्रकल्पात घेऊन त्यावर प्रक्रिया करते. सर्व पंचायत क्षेत्रात सुका कचरा गोळा करणारी केंद्रे स्थापन केली गेली आहेत, अशी माहिती डॉ. मार्टिन्स यांनी दिली.

गोवेकर सुशिक्षित तरीही...

गोव्यात घरोघरी कचरा गोळा केला जातो. मात्र, शंभर टक्के साक्षर असलेल्या गोव्यातील लोक रस्त्याकडेला कचरा टाकतात. वेळोवेळी सांगूनही ऐकत नाहीत, ही योग्य गोष्ट नाही. लोकांनी रस्त्याकडेला कचरा टाकणे बंद करुन घरोघरी कचरा गोळा करणाऱ्याकडे कचरा द्यावा असे आवाहन यावेळी डॉ. मार्टिन्स यांनी केले.

38 ठिकाणी 24 तास नजर...

ध्वनिप्रदूषणप्रकरणी सप्टेंबरपासून आजपर्यंत 36 जणांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 20 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी अधिक असलेल्या 38 ठिकाणी 24 तास ऑनलाईन पद्धतीने कडक नजर ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी निश्चित आवाज मर्यादा ओलांडताच स्वयंचलित पद्धतीने कारवाई सुरू होते, अशी माहिती डॉ. मार्टिन्स यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news