Goa toxic gas leak news| विषारी वायू गळती; खटल्याला सामोरे जा

न्यायालयाचा आदेश : मानवी जीव धोक्यात आणल्याचा आरोप
Mumbai Gas Leak Explosion
Mumbai Gas Leak Explosion : अंधेरीतील गॅस गळतीत भाजलेल्या एकाचा मृत्यूPudhari News Network
Published on
Updated on

सासष्टी : मडगाव येथील अतिरिक्त न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वैशाली ए. लोटलीकर यांनी, लेनिन मथन आणि संतोष राजकिशोर महतो नाईक यांना भारतीय दंड संहितेच्या कलम २८४ (विषारी पदार्थांबाबत निष्काळजीपणाचे वर्तन) आणि ३३६ (जीव किंवा वैयक्तिक सुरक्षितता धोक्यात आणणारे कृत्य) अंतर्गत खटल्याला सामोरे जाण्याचा आदेश दिला आहे. त्यांच्यावर मानवी जीव धोक्यात आणणाऱ्या अमोनिया वायूच्या गळतीचा संशयितांवर आरोप आहे.

सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार ही घटना १६ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजता कुंकळ्ळी येथील औद्योगिक वसाहतीत असलेल्या मे. जोकॉन्स मरिन एक्सपोर्ट प्रा. लि. कंपनीत घडली. आरोपींनी कंपनीत काम करत असताना, विषारी अमोनिया वायू हाताळताना पुरेशी सुरक्षा खबरदारी न घेतल्यामुळे निष्काळजीपणाचे कृत्य केल्याचा आरोप आहे. सरकारी पक्षाने आरोप केला आहे की, अमोनिया वायूची पाइपलाइन स्वच्छ करण्याच्या आणि त्यातील उर्वरित अमोनिया एका पाण्याच्या कंटेनरमध्ये रिकाम्या करण्याच्या प्रक्रियेदरम्यान आरोपींनी निष्काळजीपणे पाइपलाइनचे टोक कंटेनरमधून वर उचलले. यामुळे अमोनिया वायू हवेत पसरला. त्यामुळे विषारी वायूच्या श्वसनामुळे मानवी जीवाला धोका निर्माण झाला.

सहायक सरकारी वकील एस. नाईक यांनी सांगितले की, अधिकृत नोंदींनुसार वायू गळतीमुळे श्वास घेण्यास त्रास झाला होता. बचाव पक्षाचे वकील अॅडव्होकेट अमेय प्रभुदेसाई यांनी असा युक्तिवाद केला की, घटनेच्या वेळी आरोपी प्रत्यक्षात काम करत नव्हते. या घटनेत सामील असलेल्या कामगारांपैकी किंवा कंपनीच्या व्यवस्थापनातील कोणत्याही सदस्याला आरोपी म्हणून नाव देण्यात आलेले नाही. पंचनाम्यात काहीही दोषारोप करणारी बाब नव्हती आणि साक्षीदारांचे जबाब कोणत्याही वायू गळतीशी संबंधित नव्हते असे त्यांनी युक्तिवादात सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news