Goa news | व्हायरल रीलवरून टॅक्सी चालकांचा संताप

इन्फ्लुएन्सरविरोधात तक्रार; व्हिडीओमधील म्हणणे दिशाभूल करणारे असल्याचा दावा
Pimpri Crime News
Pimpri Crime NewsPudhari
Published on
Updated on

दाबोळी : गोव्यात एका व्हायरल इंस्टाग्राम रीलमुळे मोठा वाद निर्माण झाला असून, टॅक्सी चालकांनी संबंधित इन्फ्लुएन्सरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दक्षिण गोवा टॅक्सी असोसिएशनने आरोप केला आहे की, व्हिडीओमध्ये टॅक्सी चालकांवर अवाजवी भाडे आकारल्याचा चुकीचा ठपका ठेवत त्यांना 'टॅक्सी माफिया' असे संबोधण्यात आले आहे. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, संबंधित प्रवासाचे भाडे आधीच ठरवून दिले गेले होते आणि ते पूर्णपणे नियमांनुसार होते. मात्र, व्हिडीओमधील दावे खोटे व दिशाभूल करणारे असून त्यामुळे टॅक्सी चालकांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. या प्रकरणी टॅक्सी चालकांनी वास्को पोलीस स्थानकाशी संपर्क साधत अधिकृत तक्रार नोंदवली आहे.

दक्षिण गोवा टॅक्सी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वास्को पोलीस स्थानकात भेट देऊन संबंधित इन्फ्लुएन्सरकडून स्पष्टीकरण मागण्याची मागणी केली. व्हिडीओमध्ये दोन महिन्यांपूर्वीच्या एका घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेत दाबोळी विमानतळावरून महाराष्ट्रातील मालवणपर्यंत प्रवासासाठी ५,५०० रुपये भाडे आकारण्यात आले होते. संबंधित रक्कम प्रवाशाने समाधानकारकपणे अदा केल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. असे असतानाही व्हिडीओमध्ये गोव्यातील टॅक्सी चालकांना 'माफिया' ठरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात इन्फ्लुएन्सर रूपाली दीक्षित यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे टॅक्सी व्यवसायिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. संघटनेने त्यांच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल करत कडक कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन अशा प्रकारच्या आक्षेपार्ह कंटेंटवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. तथ्यांची पडताळणी करूनच मते मांडावीत, असे आवाहन केले आहे.

'व्ह्यूज' वाढवण्यासाठीचा प्रकार

संघटनेने आरोप फेटाळताना म्हटले आहे की, केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा सोशल मीडियावर 'व्ह्यूज' वाढवण्यासाठी अशा प्रकारचे दिशाभूल करणारे व्हिडीओ तयार केले जात आहेत. यामुळे गोव्याच्या पर्यटन प्रतिमेला धक्का बसत असून, पिढ्यानपिढ्या प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या टॅक्सी चालकांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे. एखादी वैयक्तिक तक्रार असल्यास ती संबंधित विभागाकडे मांडणे आवश्यक आहे. मात्र, संपूर्ण टॅक्सी समुदायाला गुन्हेगारी स्वरूपाची विशेषणे लावणे अयोग्य असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news