उद्घाटनापूर्वीच उडाले न्यायालयाच्या इमारतीचे छप्पर

मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत
North Goa District and Sessions Court Building
उद्घाटनापूर्वीच उडाले न्यायालय इमारतीचे छप्परfile photo
दीपक जाधव

पणजी : कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन होण्यापूर्वीच छप्पर उडून गेले. गेले काही दिवस गोव्यात जोरदार वार्‍यासह पाऊस पडत असून त्याचा फटका या इमारतीलाही बसला आहे.

मेरशी येथे उत्तर गोवा जिल्ह्यासाठी न्यायालयाची इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे अद्याप उद्घाटनही करण्यात आलेले नाही. इमारतीचे छप्पर उडाल्यामुळे इमारतीच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, विधानसभा अधिवेशनात न्यायालय इमारतीचे छप्पर उडाल्याचा विषय विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाचा अहवाल मागवून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news