Goa News : पणजी महापालिका मासळी मार्केट पुनर्बांधणीला दोन वर्षांनंतर गती

प्रशासकीय दिरंगाई व नियोजन त्रुटींमुळे प्रकल्प बारगळला
Fish Market
पणजी महापालिका मासळी मार्केट पुनर्बांधणीला दोन वर्षांनंतर गती(Pudhari File Photo)
Published on
Updated on

पणजी : गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाने (जीईसी) संरचनात्मकदृष्ट्या धोकादायक ठरवलेल्या पणजी महापालिकेच्या मासळी बाजाराच्या पुनर्बांधणीसाठी अखेर पणजी शहर महापालिकेने (सीसीपी) पावले उचलली आहेत. दोन वर्षांच्या विलंबानंतर नव्या बाजारपेठेच्या आराखड्यासाठी वास्तुविशारद नियुक्ती करण्याकरिता प्रस्ताव मागवले आहेत. प्रशासकीय दिरंगाई व नियोजन त्रुटींमुळे हा प्रकल्प बारगळला होता.

महापालिकेने शहरासाठी आधुनिक, कार्यक्षम आणि आकर्षक मासळी बाजार उभारण्याचा संकल्प केला असून, नव्या प्रकल्पात स्वच्छता आणि पर्यावरणीय निकषांवर विशेष भर दिला जाणार आहे. आयुक्त क्लेन मदेरा यांनी जारी केलेल्या निविदा सूचनेनुसार, नव्या बाजारपेठेचे बांधकाम दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news