Goa News | 'नौदला'च्या दुर्गा निघाल्या पृथ्वी प्रदक्षिणेला

'आयएनएसव्ही तारिणी'ला अॅडमिरल त्रिपाठी यांनी दाखवला हिरवा झेंडा
Goa News
'आयएनएसव्ही तारिणी'ला अॅडमिरल त्रिपाठी यांनी हिरवा झेंडा दाखवला Pudhari
Published on
Updated on

पणजी : नौकानयन क्षेत्रात जागतिक विक्रम करणाऱ्या भारतीय नौदलाने आणखी एक पाऊल पुढे टाकत दोन महिला नौदल अधिकाऱ्यांच्या 'नाविका सागर परिक्रमे'ला बुधवारी २ ऑक्टोबरपासून सुरुवात केली आहे. गोव्यातील आयएनएस मांडवी नौदल बेसवर लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि लेफ्टनंट कमांडर रूपा यांच्या 'आयएनएसव्ही तारिणी'ला नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी हिरवा झेंडा दाखवला. भारतीय महिलांनी दुहेरी हाताने चालवलेल्या जहाजावरची ही जागतिक मोहीम भारताच्या सागरी प्रयत्नांचे प्रतीक आहे. जागतिक सागरी मोहीम घडामोडीतील देशाचे महत्त्व, उत्कृष्टता आणि महिला सक्षमीकरणासाठी भारतीय नौदलाची वचनबद्धता दर्शवते. यावेळी व्हाईस अॅडमिरल व्ही. श्रीनिवास, आरती सरीन, विनीत मॅक कार्टी, एल. एस. पठानिया, मुख्य जलविज्ञानी, अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

नौदल प्रमुख त्रिपाठी म्हणाले, ही सागर परिक्रमा धाडसी शौर्याचे प्रतीकात्मक अभिव्यक्ती आणि सागरी चेतना जोपासण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. देखभालीसाठी चार बंदरांवर थांबणार दुसरी आयएनएसव्ही नॉटिकल मैल (अंदाजे ४०,००० किमी) पेक्षा जास्त अंतराची असून आवश्यकतेनुसार पुनर्भरण आणि देखभालीसाठी चार आंतरराष्ट्रीय बंदरांवर थांबेल. यात फ्रेमंटल ऑस्ट्रेलिया, लिटलटन न्युझीलंड, पोर्ट स्टॅनली-फॉकलंड, केपटाऊन दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे.

तारिणीने कापलेय ६६ हजार नॉटिकल मैलाचे अंतर मेसर्स आक्वारिस शिपयार्डने बनवलेले आयएनएसव्ही तारिणी हे ५६ फुटांचे नौकानयन जहाज १८ फेब्रुवारी २०१७ रोजी भारतीय नौदलात सामील झाले. या जहाजाने ६६ हजार नॉटिकल मैल (१,२२,२२३ कि.मी.) पेक्षा जास्त अंतर कापले असून नाविका सागरच्या पहिल्या आवृत्तीत सहभाग घेतला आहे. २०१७ मध्ये गोवा ते रिओ, गोवा ते पोर्ट लुई आणि इतर महत्त्वाच्या मोहिमांमध्ये हे जहाज सहभागी झाले आहे. हे जहाज अत्याधुनिक नेव्हिगेशन, सुरक्षा आणि दळणवळण उपकरणांनी सुसज्ज आहे. ३८ हजार नॉटिकल मैलच्या नौकानयनाचा अनुभव असलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांनी ३ वर्षांहून अधिक काळ या महाकाव्य प्रवासासाठी प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना सागरी नौकानयनाच्या पैलूंवर सीमनशिप, हवामानशाख, नेव्हिगेशन, जगण्याची तंत्रे आणि समुद्रातील औषधोपचार यावर प्रशिक्षण देण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news