

पणजी : मोप विमानतळावरील आंदोलन प्रकरणी पेडणे प्रथमश्रेणी न्यायालयाने आमदार विजय सरदेसाई यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ व इतर राजकीय नेत्यांसह ५४ जणांना समन्स बजावले आहे. या सर्वांना १५ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
मोप आंदोलन प्रकरणी पेडणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. विमानतळाचे संचालन करणाऱ्या जीएमआर ग्रुप कंपनीने टॅक्सी व्यावसायिकांसाठी पार्किंग शुल्कात अचानक वाढ केली होती व विमानतळावर प्रवासी सोडण्यासाठी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाहन थांबवल्यास जादा शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्याने टॅक्सी चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत २९ सप्टेंबर २०२५ रोजी आंदोलन छेडले होते. हे आंदोलन आमदार विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली झाले होते. या आंदोलनानंतर पोलिसांनी सीसी टीव्ही फुटेजद्वारे कारवाई करत अनेकांवर गुन्हे दाखल केले होते.
यामध्ये गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख व आमदार विजय सरदेसाई यांच्यासह निखिल महाले, रामा वारंग, भारत वरक, साहिल मलिक, रमेश वरक, समीर महाले, चेतन कामत, अजय गडेकर, राजेश सावंत, राहुल गावस, संकेत महाले, साईल महाले, सुरेश वरक, योगेश गोवेकर, गुरुप्रसाद मालकर, लक्ष्मण गावस, जनार्दन वरक, सुमित जाधव, सुवेक गावस, तुकाराम परब, दुर्गादास कामत, अभिषेक तोरसकर, करण वारंग, दिनेश खडपे, संदेश गावस, शशिकांत गावस, रोशन गावस, सौरव गावस, गौरेश गावस, कृष्णा गावस, अमित सावंत, निखिल भाईप, रामचंद्र गावस, सिद्धेश महाले, विष्णू शिरोडकर, दीपक कलंगुटकर, रोहित पालेकर, रामा आरोलकर, राजन आरोलकर, ओमकार आरोन्देकर, रितिक परब, संदेश शेट्ये, रुपेंद्र परब, आशिष वागडेकर, मृणाल महाले, तुषार आमोणकर, कालिदास कांबळी, विजय परब, सज्जन सातार्डेकर आदींचा समावेश आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या या गुन्ह्यांमुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे.