Goa Politics : फोंडा मतदारसंघाची जबाबदारी आपल्यावर

मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण : मंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम
CM Pramod Sawant
डॉ. प्रमोद सावंतPudhari File Photo
Published on
Updated on

पणजी : फोंडा मतदारसंघासाठी आमदार नसला तरी या मतदारसंघाची जबाबदारी आपण घेतलेली आहे. यापूर्वीही आपण हे स्पष्ट केले आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. मात्र, मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्र्यांनी अद्याप सस्पेन्स कायम ठेवले आहे.

शुक्रवारी एका कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांना फोंडा मतदारसंघात आमदार नसल्यामुळे लोकांना आपल्या समस्या कुणाक़डे मांडायच्या असा प्रश्ऩ निर्माण झाल्याचे पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून देतात फोंड्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे. त्यामुळे फोंड्याच्या लोकांनी आपल्याकडे समस्या घेऊन यावे, असे डॉ. सावंत म्हणाले.

रिक्त मंत्रिपदावर कोणाची वर्णी लावणार का? गोविंद गावडे यांचे नाव चर्चेत आहे असे मुख्यमंत्र्यांना विचारले असता लवकरच रिक्त मंत्रिपद भरले जाईल आणि त्यानंतर कोणाची वर्णी लागते हे सगळ्यांना कळेल असे सांगून नव्या मंत्र्याच्या नावाबाबत मुख्यमंत्र्यानी मौन पाळले. त्यामुळे मंत्रीपदाचा सस्पेन्स कायम राहिला आहे.

वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही माध्यमांशी बोलताना फोंडा मतदारसंघात आमदार नसल्यामुळे तेथील लोक आपल्याकडे कामे घेऊन येत असल्याचे म्हटले होते. फोंडा मतदारसंघ हा मगोचा बालेकिल्ला असल्यामुळे आणि यापूर्वी आम्ही तेथे भरीव काम केलेले असल्यामुळे फोंड्याचे लोक आपल्याकडे येत असल्याचे ढवळीकर यांनी म्हटले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news