Pramod Sawant : लोकांच्या संपर्कात राहा, विकासकामे पूर्ण करा

मुख्यमंत्र्यांचे आवाहन : तीन हजार घरांचे जूनमध्ये वितरण; निवडणूक तयारीला वेग
CM Pramod Sawant
Pramod Sawant
Published on
Updated on

पणजी : 'एनडीए'चे घटक असलेल्या भारतीय जनता पक्ष, मगो व अपक्ष आमदारांची महत्त्वाची बैठक शुक्रवारी पणजीतील एका हॉटेलमध्ये झाली. या बैठकीत आपापल्या मतदारसंघातील अपूर्ण विकासकामे पूर्ण करा, लोकांच्या संपर्कात राहा, राज्य व केंद्रीय योजनांचा लाभ लोकांना द्या आदी संदेश देण्यात आले. विधानसभा निवडणुका येत्या आठ महिन्यांत होणार असल्याने ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते. माझे घर योजनेंतर्गत ३ हजार सदनिकांचे वितरण ११ जूनला होणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बैठकीत सांगितले. दरम्यान, या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असाच संदेश देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, भाजपचे मंत्री व आमदार, मगोचे मंत्री सुदिन ढवळीकर तसेच अपक्ष आमदार डॉ. चंद्रकात शेट्ये, आलेक्स रेजीनाल्ड, आंतोन वास यावेळी उपस्थित होते.

बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून १२ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तसेच पश्चिम बंगाल, आसाम, पुद्दुचेरी येथे भाजपची सरकारे आल्याबद्दल मोदी यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले. आपापल्या मतदारसंघात सुरू असलेले विकास प्रकल्प पूर्ण करून घ्या, योजना लोकांपर्यंत न्या, आदी निर्देश या बैठकीत देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news