

पणजी : पणजी जवळच्या करंझाळे समुद्रकिनारी परिसरात पकडलेले मासे खाणे आरोग्याला धोकादायक ठरू शकतात, असा दावा गोवा विद्यापीठातील अभ्यासकांनी केला आहे.
गोवा विद्यापीठाच्या एका पथकाने केलेल्या अभ्यासानुसार, मिरामार जवळील कारंझाळे समुद्रकिनाऱ्यावरून पकडलेले माशांमध्ये जड धातूंचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येथील माशांच्या नियमित सेवनामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
अभ्यासात असे आढळून आले आहे की, करंझाळे परिसरात पकडल्या जाणाऱ्या माशांमध्ये मर्यादेपेक्षा जास्त धाव आहेत. त्यामुळे खाणाऱ्यांच्या आरोग्याव दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यत आहे.
प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढले...
गोव्याच्या शहरी किनारपट्टीवर समुद्री खाद्य सुरक्षेचे कठोर निरीक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. या किनाऱ्यावर प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण वाढलेले असल्याने त्याचा परिणाम माशांवर झाला आहे. त्यामुळे येथे पकडलेले मासे खाल्यास आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असे अभ्यासकांनी म्हटले आहे.