

पणजी : सुमारे ५०० कोटींच्या पाँझी (डीबी स्टॉक) घोटाळ्यातील संशयित आरोपी दीपंकर बर्मन (वय ३०) अभिगुणा रेसिडेन्सी, गोलानगर पोलिस स्थानक, जालिखारी) याला गोव्यात अटक करण्यात आली. तो फरार होता आणि गुवाहाटी पोलिस त्याच्या मागावर होते. सहायक पोलिस आयुक्त महतो सिद्धप्रसाद अमितकुमार यांच्या नेतृत्वाखालील एक पथक या घोटाळ्यातील केस संदर्भात तपासासाठी गोव्यात आले होते. दरम्यान, त्यांना आवश्यक ती मदत गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने केली आणि संशयित आरोपी दीपंकर बर्मन याच्या मुसक्या आवळल्या.