Goa Natural Springs Census | राज्यात 1,196 नैसर्गिक झरे; 25 पूर्णपणे आटले

Goa Natural Springs Census | केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा अहवाल; ९२.४ टक्के बारमाही झरे
Goa Natural Springs Census
Goa Natural Springs CensusPudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील नैसर्गिक जलस्रोतांची स्थिती स्पष्ट करणाऱ्या पहिल्या गणनेत राज्यात १,१९६ नैसर्गिक झरे असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १,१०५ म्हणजेच ९२.४ टक्के झरे बारमाही वाहणारे आहेत. मात्र, २५ झरे पूर्णपणे आटले असून ६१ झरे धोक्याच्या स्थितीत आहेत. यातील १४ झरे गंभीर धोक्याच्या श्रेणीत आहेत.

Goa Natural Springs Census
Goa News | गोव्यातील मडगाव, पणजी अन् वास्को कदंब बसस्थानकांचा कायापालट होणार; उल्हास तुयेकर यांची घोषणा

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या गणनेनुसार दक्षिण गोव्यात ८६१, तर उत्तर गोव्यात ३३५ झरे आहेत. यापैकी १,११७ म्हणजेच ९३.४ टक्के झरे ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे गावांमधील पिण्याच्या पाण्याचा स्रोत म्हणून त्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

डोंगराळ व वनक्षेत्रांत, विशेषतः पश्चिम घाट आणि लगतच्या पायथ्याच्या भागात झऱ्यांची संख्या मोठी आहे. धोक्याचे मूल्यांकन केलेल्या झऱ्यांपैकी २५ कमी, २२ मध्यम आणि १४ उच्च धोक्याच्या श्रेणीत आहेत. त्यामुळे झऱ्यांचे संवर्धन आणि त्यांच्या पाणलोट क्षेत्रांचे संरक्षण करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Goa Natural Springs Census
Panaji Voter List | पणजी मतदारसंघातील मतदार यादीत फेरफार

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पुढाकारातून झालेल्या या पहिल्या झऱ्यांच्या गणनेचा उद्देश देशातील भूजल स्रोतांचे मॅपिंग, त्यांची स्थिती जाणून घेणे आणि भविष्यातील व्यवस्थापनासाठी मूलभूत माहिती उपलब्ध करून देणे हा आहे. या जनगणनेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला.

१,०५४ झिरपणारे झरे...:

गणनेत १,१०५ बारमाही आणि ६६ हंगामी झरे नोंदवण्यात आले आहेत. रचनेनुसार १,०५४ झरे झिरपणारे, तर १४२ झरे मुक्त प्रवाहाचे आहेत. झऱ्यांवर आधारित पाणीपुरवठ्याच्या पायाभूत सुविधाही मर्यादित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. केवळ ३४१ झऱ्यांवर पाणी संकलन कक्ष किंवा टाक्या आहेत, तर १८९ झऱ्यांना पाइपद्वारे पाणीपुरवठ्याची सुविधा जोडलेली आहे. राज्यातील नागरिक ७५५ झऱ्यांवर थेट अवलंबून असून, त्यापैकी ३० झऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबित्व आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news