

पेडणे : रशियन पर्यटक आलेक्सेई लिओनोव याने हरमल व मोरजी येथील दोन रशियन महिलांचा निघृणपणे गळा चिरून खून केल्याची घटना घडल्यानंतर पूर्ण पेडणे तालुका हादरला आहे. मांद्रे पोलिस संशयितांच्या जवान्या घेत असून खुनाचे कारण व आणखीन असे खून केलेत का याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संशयिताचे एलिना नामक रशियन युवतीशी प्रेमसंबंध होते. त्या युवतीने इतर कोणाशी संबंध ठेवल्याच्या संशयाने संशयिताने डाव रचून तिचा खून केल्याची माहिती तपासातून पोलिसांना उपलब्ध झाली आहे. हरमल गिरकरवाडा येथे एलिना कास्तानोव्हा या ३७ वर्षीय रशियन युवतीचा आलेक्सेई लिओनोवने गळा चिरून खून केला.
त्यानंतर मौरजी-मथलावाडा वैधील एलिना दिया त्याच पद्धतीने गळा चिरून खून केल्याची घटना घडली. एलिना ही मधलावाडा मोरजी येथे एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होती. या घटनेची मांई पोलिस निरीक्षक वीरेंद्र नाईक यांना माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सलीम शेख, मोप पोलिस निरीक्षक निनाद देऊळकर, का पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला