Goa Dam Water Levels 2026 | राज्यातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ

Goa Dam Water Levels 2026 | जलस्रोत विभागाने ३० जून रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मान्सूनच्या पावसामुळे प्रमुख धरणांमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे.
Dam Water Storage
Dam Water StoragePudhari
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा

जलस्रोत विभागाने ३० जून रोजी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील पाणलोट क्षेत्रात पडलेल्या मान्सूनच्या पावसामुळे प्रमुख धरणांमधील पाणी पातळीत वाढ झाली आहे. या जलाशयांपैकी, साळावली धरणात ५८०.२५ मिमी पावसाची नोंद झाली.

Dam Water Storage
Ahilyanagar Water Crisis: नगर जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट; धरणांमध्ये फक्त २८.६१ टक्के पाणीसाठा

पाण्याची पातळी ३१.६५ मीटरवर पोहोचली आहे. धरणातील पाणीसाठा ७,३५९ हेक्टर मीटर म्हणजेच त्याच्या ३१.४ टक्के झाला आहे. अंजुणे धरणात सर्वाधिक ६८३.२० मिमी पावसाची नोंद झाली, तर त्याचा पाणीसाठा ४९१.५० हेक्टर मीटरवर म्हणजे ११ टक्केवार पोहोचला आहे.

Dam Water Storage
Sangli Rain: अखेर जिल्ह्यात मान्सूनचे आगमन

आमठाणे धरणात ५२० मिमी पावसाची नोंद झाली असून पाणीसाठा ५५.९ टक्केवर, तर चापोली धरण क्षेत्रात ६४६.२० मिमी पाऊस पडला असून पाणीसाठा ४८ टक्केवर पोहोचला आहे. दिवसभरात पावसाची नोंद न होऊनही, गवाणे धरण ५५.४ टक्के, तर ५६५.०४ मिमी पावसानंतर पंचवाडी धरण २३.५ टक्के भरले आहे. दरम्यान, तिलारी धरणात ५०५.६० मिमी पावसाची नोंद झाली असून धरणात २६.४१ टक्के पाणी साठा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news