Minister Nilkanth Halarnkar | 2036 पर्यंत 'स्वयंपूर्ण गोवा'चे ध्येय गाठू

Minister Nilkanth Halarnkar | मंत्री नीळकंठ हळर्णकर : कोलवाळेत थिवी मतदारसंघातर्फे महिला मेळाव्यास प्रतिसाद
Minister Nilkanth Halarnkar
Minister Nilkanth Halarnkar
Published on
Updated on

हळदोणे : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०४७पर्यंत विकसित भारत करण्याचे ध्येय आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे २०३६ पर्यंत स्वयंपूर्ण गोवा करण्याचे ध्येय आहे. भाजप सरकारतर्फे जनतेची कामे पूर्ण क्षमतेने करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन मच्छीमार मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी कोलवाळ येथील साळकर सभागृहात थिवी मतदार संघातर्फे आयोजित महिला मेळाव्यात बोलताना केले.

Minister Nilkanth Halarnkar
Gas Cylinder Shortage: गॅस सिलिंडर टंचाईचा ग्रामीण भागात परिणाम; महिलांचा मोर्चा चुलीकडे

यावेळी व्यासपीठावर कामूर्ती उपसरपंच संगीता नाईक, रेवोडा सरपंच विजयेता फडते, कोलवाळ आरोग्य केंद्राच्या डॉ. शुभ्रा भोसले, श्रीराम विद्यामंदिरच्या संचालिका माधवी हळर्णकर, थिवी गट भाजप अध्यक्ष सुमित देसाई, सपना मापारी, दीक्षा कांदोळकर, महिला मोर्चा अध्यक्ष विश्वजा हळदणकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

तपासणी करण्यासाठी प्रत्येक महिन्यात पंचायत क्षेत्रात आरोग्य खात्यातर्फे शिबिरांचे आयोजन करून महिलांची तपासणी करून कोणत्याही रोगाची बाधा झाल्यास मोफत औषध उपचार करण्यात येत आहेत.

Minister Nilkanth Halarnkar
Nashik Water Crisis | मुळेगावच्या महिलांचे रिकाम्या हंड्यांसह आंदोलन

महिलांना होणाऱ्या अनेक प्रकारच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी खास आरोग्य मोहीम राबवण्यात येत असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. महिला मोर्चा अध्यक्ष विश्वजा हळदणकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

महिलांच्या आरोग्याला प्राधान्य : डॉ. भोसले कोलवाळ

आरोग्य केंद्राच्या डॉ. शुभ्रा भोसले यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आरोग्य खात्यातर्फे महिलांसाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. गरोदर महिलांना मोफत औषध व प्रसूतीपर्यंत सर्व खर्च आरोग्य खात्यातर्फे करण्यात येत आहे. महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खास महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news