Margao Garden Worker Clash | कामगार मारहाणीचा मुद्दा 'जनता दरबारा'त

Margao Garden Worker Clash | मडगाव पालिका उद्यानात बेकायदा गर्दीवर कारवाईचे मंत्री कामत यांचे आदेश
Margao Garden Worker Clash
Margao Garden Worker Clash
Published on
Updated on

मडगाव : पुढारी वृत्तसेवा

मडगाव नगरपालिकेचे उद्यान हे परराज्यातून गोव्यात येणाऱ्या कामगारांचे अनधिकृत 'मीटिंग पॉईंट' बनल्याने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रविवारी दोन गटांतील परप्रांतीय कामगारांमध्ये झालेल्या हाणामारीचे वृत्त दै. 'पुढारी'ने ठळकपणे प्रसिद्ध केल्यानंतर त्याची तातडीने दखल घेण्यात आली.

Margao Garden Worker Clash
Goa News | असहायतेच्या अंधारात हवा त्यांना मायेचा आधार

मंगळवारी आयोजित जनता दरबारात या विषयावर चर्चा करत मडगावचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दिंबर कामत यांनी मडगाव नगरपालिकेचे प्रशासक श्रीनेत कोठावळे आणि संबंधित अधिकाऱ्यांना उद्यानातील बेकायदा गर्दी, दंगलखोर प्रवृत्ती आणि वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.

जनता दरबारात नागरिकांकडून उपस्थित करण्यात आलेल्या या गंभीर प्रश्नावर मंत्री कामत यांनी तातडीने अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी प्रशासक श्रीनेत कोठावळे यांनी रेल्वेमार्गे गोव्यात येणाऱ्या परप्रांतीय कामगारांना विविध कंत्राटदारांकडून मडगाव पालिका उद्यानाचा पत्ता दिला जात असल्याची माहिती दिली.

त्यामुळे काम मिळेपर्यंत शेकडो कामगार उद्यानात थांबत असून हे ठिकाण त्यांच्या जमण्याचे प्रमुख केंद्र बनल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रविवारी दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे उद्यान परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर शहरभर संताप व्यक्त करण्यात आला. दैनिक 'पुढारी'ने या प्रकाराचे वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

मंत्री कामत यांनी उद्यान परिसरात कायमस्वरूपी पोलीस गस्त वाढविणे तसेच कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Margao Garden Worker Clash
Goa News | असहायतेच्या अंधारात हवा त्यांना मायेचा आधार

रेल्वे स्थानकावर स्वतंत्र पोलीस बूथ उभारा

रेल्वे स्थानक परिसरात वाढत असलेल्या चोरी व पाकीटमारीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे स्थानक परिसर आणि मागील प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. रेल्वे स्थानकावर स्वतंत्र पोलीस बूथ उभारण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नाही

जनता दरबारात उपस्थित अधिकारी, पालिका प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत सार्वजनिक ठिकाणी शिस्त आणि कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबविण्याचे आदेश मंत्री कामत यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news