Goa Mining Rules | गोव्यातील खाण कंपन्यांसाठी नवे नियम लागू; पाण्याच्या वापरावर प्रदूषण मंडळाची कडक नजर

Goa Mining Rules | खाण प्रकल्पांना 'कन्सेंट टू ऑपरेट' देताना किंवा त्याचे नूतनीकरण करताना जलस्रोत, पाण्याचे प्रमाण आणि आवश्यक परवानग्यांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे.
Mhasla Bauxite Mining
Goa Mining Rules Pudhari
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) नव्या निर्देशांची अंमलबजावणी करताना गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (जीपीसीबी) खाण प्रकल्पांमधील पाण्याच्या वापराबाबत नियम अधिक कडक केले आहेत. खाण प्रकल्पांना 'कन्सेंट टू ऑपरेट' देताना किंवा त्याचे नूतनीकरण करताना जलस्रोत, पाण्याचे प्रमाण आणि आवश्यक परवानग्यांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे.

Mhasla Bauxite Mining
IFFI Goa | समुद्रकिनारा, चित्रपट आणि कलाप्रेम! इफ्फीच्या रंगात रंगली गोव्याची राजधानी पणजी

खाण प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी किंवा त्याच्या परवानगीचे नूतनीकरण करण्यासाठी संबंधित प्रकल्प प्रस्तावाला खाणीत वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा स्रोत स्पष्टपणे जाहीर करावा लागणार आहे. प्रस्तावित जलस्रोत आणि प्रकल्पासाठी आवश्यक असलेले पाण्याचे प्रमाण पुरेसे आहे की नाही, याचीही जीपीसीबीकडून पडताळणी केली जाणार आहे.

दरम्यान, गोव्यात लोहखनिज खाणकाम पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्याने आतापर्यंत १७ खाण ब्लॉक्सचा लिलाव केला असून, त्यापैकी सहा खाणींमध्ये प्रत्यक्ष कामकाज सुरू झाले आहे. पर्यावरण आणि वनविषयक मंजुरीच्या प्रक्रियेमुळे उर्वरित खाण ब्लॉक्समध्ये अद्याप उत्खनन सुरू झालेले नाही.

खाणकाम पुन्हा सुरू होत असताना पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी जीपीसीबीने घेतलेल्या या निर्णयामुळे खाण कंपन्यांना जलस्रोत आणि त्याच्या वापराबाबत अधिक काटेकोरपणे नियमांचे पालन करावे लागणार आहे.

दरम्यान, केंद्रीय खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला गोव्यातील लोहखनिज खाणकाम पुन्हा सुरू करण्यासंदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले होते. डम्पमधील खनिज काढण्यासह खाणकामाशी संबंधित विविध मुद्द्यांवर केंद्र सरकार राज्यासोबत काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

Mhasla Bauxite Mining
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

नव्या नियमांनुसार

  • 'कन्सेंट टू ऑपरेट'ची वैधता पूर्वीप्रमाणे पाच वर्षांची न राहता संबंधित खाण कराराच्या कालावधीइतकी राहणार आहे.

  • भूजलाचा उपसा होत असल्यास संबंधित खाण चालकाला भूजल उपशाची आवश्यक परवानगी सादर करावी लागणार आहे.

  • पिण्यासाठी, धूळ नियंत्रणासाठी पाणी शिंपडणे किंवा अन्य कामांसाठी बाह्य पुरवठादाराकडून पाणी घेतल्यास त्या पुरवठादाराकडे आवश्यक 'कन्सेंट टू एस्टॅब्लिश' किंवा 'कन्सेंट टू ऑपरेट' परवानगी आहे की नाही, याची जीपीसीबी खात्री करणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.