Goa news | 'मातृत्व योजना'ला राष्ट्रीय पातळीवर मान्यता

नावीन्यपूर्ण योजनेच्या कार्याची दखल; स्कोच पुरस्कारासाठी निवड
Goa news | 'मातृत्व योजना'ला राष्ट्रीय पातळीवर मान्यता
Published on
Updated on

पणजी : गोवा सरकारच्या आदिवासी कल्याण संचालनालयासाठी अभिमानाची बाब ठरली असून, संचालक निलेश धायगोडकर यांची 'मातृत्व योजना' या उपक्रमासाठी प्रतिष्ठित स्कोच पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

ही योजना देशातील इतर कोणत्याही राज्यात उपलब्ध नसलेली नावीन्यपूर्ण योजना असून तिची संकल्पना व अंमलबजावणी आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री डॉ. रमेश तवडकर यांच्या दूरदृष्टीतून साकार झाली आहे. या योजनेअंतर्गत अपत्यप्राप्तीत अडचणी येणाऱ्या आदिवासी कुटुंबांना उपचारासाठी तब्बल ५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाते, ज्यामुळे अनेक कुटुंबांना नवजीवनाची आशा मिळाली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संचालक निलेश धायगोडकर व आदिवासी कल्याण संचालनालयाचे अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

लोकहिताच्या योजना राबविण्यास आम्ही कटिबद्ध

मंत्री डॉ. रमेश तवडकर यांनी सांगितले की, 'मातृत्व योजना' ही आदिवासी बांधवांच्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात आली असून तिच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना आधार मिळत आहे. या योजनेला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दखल अत्यंत आनंददायी असून यापुढेही अशा लोकहिताच्या योजना राबविण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news