Goa Calangute Fire | कळंगुटमध्ये भीषण आगीत चार शॅक्स जळून खाक

शॅकमध्ये आग विझवण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणांचा अभाव
Calangute Beach Shacks
Calangute Beach ShacksPudhari
Published on: 
Updated on: 

Calangute Beach Shacks

पणजी : गौरावाडा - कळंगुट परिसरात गुरूवारी (दि.१९) दुपारी लागलेल्या आगीत चार शॅक्स जळून खाक झाले. या आगीमुळे शॅक्सचे लाखोंचे नुकसान झाले आहे. आगीच्या घटनेपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने अग्निशमन दलाचे वाहन पोहचू शकले नाही. शॅक मालकांनी पाणी व रेतीच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते व्यर्थ ठरले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कळंगुट येथील शॅक्सना अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि एका रांगेत असलेले चार शॅक्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शॅकमध्ये असलेले सामान वाचवण्यासाठी शॅक मालकांनी व कर्मचाऱ्यांनी बादलीने पाणी तसेच रेती मारून ती विझवण्याचे प्रयत्न केले मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने हे प्रयत्न तोकडे पडले.

Calangute Beach Shacks
Goa News | केंद्राच्या निर्देशानुसार गोव्यातील दुकाने, मॉल्स २४ तास खुले राहणार

या आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली मात्र आगीच्या ठिकाणापर्यंत जाण्यासाठी वाळू असल्याने पाण्याचे बंबने पाणी फवारणी करून ही आग आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. या घटनेमुळे समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या शॅकच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या शॅकमध्ये आग विझवण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणेही नव्हती. त्यामुळे या शॅक मालकांनी व्यवसायासाठी अग्निशमन दलाची परवानगी घेताना त्यात नमूद केलेल्या अटींची पूर्तता केली होती का याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

Calangute Beach Shacks
Goa BJP Rebellion News | इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपपुढे बंडखोरीचे संकट

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच या घटनेत नेमकी किती आर्थिक हानी झाली, याचा अधिकृत तपशीलही समोर आलेला नाही. या घटनास्थळी स्थानिक आमदार मायकल लोबो तसेच पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी भेट देऊन झालेल्या घटनेसंदर्भात माहिती घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.