Goa Marcel Chikhal Kalo | माशेलचा विठ्ठल भक्तांचा पारंपरिक चिखलकाला पोहोचला जगभरात!

समईतील तेल अंगाला लावून देऊळवाड्यावरील विठ्ठल भक्त उतरतात चिखलात
Goa Marcel Chikhal Kalo | माशेलचा विठ्ठल भक्तांचा पारंपरिक चिखलकाला पोहोचला जगभरात!
Goa Marcel Chikhal Kalo | चिखल काल्यात रंगून गेलेले बाळ गोपाळ
Published on
Updated on

माशेल : आषाढी एकादशी निमित्त श्री. देवकीकृष्ण मंदिरात सुरु असलेल्या २४ तासांच्या अखंड भजनी सप्ताहाची रविवारी द्वादशीला दुपारी समाप्ती झाली. तदनंतर प्रज्वलित समईतील तेल अंगाला लावून देऊळवाड्यावरील विठ्ठल भक्त पारंपरिक चिखलकाला साजरा करण्यासाठी, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल नामाचा गजर करित कृष्णाक्रीडा खेळण्यासाठी मैदानावर उतरले .

प्रथम एकमेकांच्या अंगाला टिळा लावून मृदंग व टाळ्यांच्या गजरात मातीशी निगडित विविध खेळांना प्रारंभ झाला. मनोरंजक चक्र, बेडूक उड्डया, आंधळी कोशिंबीर, अंताक्षरी , घोडा गाडी , आरोळी ठोकणे, नवरा नवरी बनून विवाह लावणे असे अनेक खेळ खेळण्यात आले . या उत्सवांवेळी देवस्थानाचे असंख्य महाजन व भक्तगण श्रद्धेने देवाचे दर्शन घेऊन आपापला नवस पूर्ण करतात.

कृष्णाक्रीडा खेळून संपल्यानंतर शेवटी दहिहंडीचा कार्यक्रम झाला व तदनंतर भाविकांनी नवसपूर्ण करण्यासाठी आणलेला प्रसाद सर्वाना वाटणयात आला. सर्व हरिभक्तांनी नंतर पारंपरिक विहिरीवर जाऊन स्नान केले व चहा फराळ घेऊन आपापल्या घरी निघून गेले.

शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा प्रसिद्ध चिखलकाला , यंदा राज्यस्तरावर साजरा करण्यात येणारे हे चौथे वर्ष. माशेलतील चिखलकाला देश विदेशात पोहोचवण्याचे दिव्य काम पर्यटन खाते करत आहे त्याबद्दल त्यांचे माशेलकराकडून कौतुकही केले जात आहे. माशेलातील या चिखल केल्यामुळेच गोवा पर्यटन खात्याला भारत सरकार कडून पुरस्कार प्राप्त झाला ही माशेलवासीया साठी अभिमानास्पद गोष्ट आहे.

यंदा पर्यटन मंत्री रोहन खवटे जरा उशिरा पोहोचल्यामुळे त्यांना चिखलकाल्याचा प्रत्यक्ष आनंद लुटता आला नाही. यंदाही माजी मंत्री तथा आमदार गोविंद गावडे चिखल काल्याला दिसले नाही. लोकांचाही आनंद द्विगुणित झाला. "यारे गडी यारे गोपाळ गाडी यारे" हे पारंपरिक लोकगीत गात खेळ खेळत बाळ गोपाळांनी मन मुराद पारंपरिक चिखलकाल्याचा आनंद लुटत होते .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news