Goa Beaches | गोव्याच्या दोन समुद्रकिनाऱ्यांना मिळणार आंतरराष्ट्रीय ओळख! 'ब्लू फ्लॅग' मानांकनाच्या शर्यतीत

Goa Beaches | देशातील निवडक 24 समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत समाविष्टची शक्यता
beaches Blue Flag award
beaches Blue Flag award
Published on: 
Updated on: 

पणजी : पुढारी वृत्तसेवा

उत्तर गोव्यातील मांद्रे आणि दक्षिण गोव्यातील गालजीबाग समुद्रकिनारा २०२६-२७ या हंगामासाठी देशातील 'ब्लू फ्लॅग' मानांकनासाठी निवडल्या जाणाऱ्या २४ समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, सुरक्षा आणि शाश्वत पर्यटनाच्या दृष्टीने या दोन्ही किनाऱ्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांचा या मानांकनासाठी विचार केला जात आहे.

beaches Blue Flag award
Panaji Market | पणजी बाजारात उष्णतेचा कडाका वाढल्याने लिंबू प्रतिनग 10 रुपयांवर तर शहाळे 70 रुपयांवर पोहोचले

मांद्रे समुद्रकिनारा आपल्या निसर्गरम्य किनारपट्टी, वनश्री आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखला जातो या किनाऱ्याचे व्यवस्थापन पर्यटन विभागाकडून केले जाते. दुसरीकडे, दक्षिण गोव्यातील गालजीबाग हा स्वच्छ व तुलनेने निर्मळ पर्यावरणासाठी तसेच ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनाचे महत्त्वाचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे, या किनाऱ्याचे व्यवस्थापन वन विभागाच्या अखत्यारित आहे.

'ब्लू फ्लॅग' हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणीय मानांकन असून डेन्मार्कस्थित फाऊंडेशन फॉर एन्व्हायरनमेंट एज्युकेशन (एफईई) या संस्थेकडून ते दिले जाते. या मानांकनासाठी पर्यावरणीय व्यवस्थापन, पाण्याची गुणवत्ता, स्वच्छता, सुरक्षा, पर्यावरणविषयक शिक्षण आणि समुद्रकिनाऱ्यावर सर्वांसाठी सुलभ प्रवेश अशा विविध बार्बीशी संबंधित कठोर निकषांची पूर्तता करावी लागते.

या मानांकनाचा प्रमुख उद्देश समुद्रकिनाऱ्यांचे पर्यावरण संरक्षण करताना शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा आहे. मांद्रे आणि गालजीबाग येथे 'ब्लू फ्लॅग' हंगाम १५ ऑक्टोबर ते ३१ मे दरम्यान असण्याची शक्यता आहे.

या मानांकनामुळे नागरिकांचा सार्वजनिक प्रवेश किंवा समुद्रकिनाऱ्याचा वापर बंद होणार नसून, प्रवेश शुल्क आणि सेस आकारला जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, कासवांच्या संवर्धनाच्या संवेदनशील क्षेत्रांच्या संरक्षणाच्या दृष्टीने या प्रस्तावामुळे काही स्थानिक पातळीवरील विविध चिंता पुढे येत आहेत.

निकषांची पूर्तता करणे आवश्यक

मिरामारच्या अनुभवामुळे पाण्याची गुणवत्ता हा मुद्दाही महत्त्वाचा ठरतो. अभ्यासांमध्ये या समुद्रकिनाऱ्यावरील फिकल कॉलिफॉर्मचे प्रमाण सुरक्षित मयदिपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले होते. 'ब्लू फ्लॅग' मानांकनात समुद्राच्या पाण्याची गुणवत्ता आणि पर्यटकांच्या आरोग्य-सुरक्षेला विशेष महत्त्व असल्याने संबंधित निकषांची पूर्तता करणे आवश्यक ठरणार आहे.

त्यामुळे मांद्रे आणि गालजीबाग या समुद्रकिनाऱ्यांना 'ब्लू फ्लॅग' मानांकन मिळाल्यास गोव्याच्या शाश्वत पर्यटनाला चालना मिळू शकते; मात्र त्याचवेळी स्थानिक उपजीविका, पारंपरिक किनारी उपक्रम आणि संवेदनशील पर्यावरण यांच्यात योग्य समतोल राखण्याचे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे.

beaches Blue Flag award
Panaji shopkeepers fire safety demand|पणजी मार्केटमधील १०९ दुकानांना आगीचा धोका

ब्लू फ्लॅग मानांकनाचे फायदे

ब्लू फ्लॅग मानांकनामुळे समुद्रकिनाऱ्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळून पर्यटनाला चालना मिळते. परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यास मदत होते. या मानांकनासाठी किनाऱ्यावरील स्वच्छता, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा दर्जेदार असणे आवश्यक आहे.

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जीवरक्षक, प्रथमोपचार आणि आपत्कालीन मदतीची व्यवस्था करावी लागते. समुद्राचे पाणी, किनारपट्टी आणि जैवविविधतेचे संरक्षण करण्यावर भर दिला जातो. तसेच माहिती फलक, पार्किंग आणि दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधाही विकसित कराव्या लागतात. या सुविधांमुळे पर्यटनाचा दर्जा उंचावतो. पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत झाल्यास व्यवसायाला चालना मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.